
...म्हणून गिरीशभाऊंनी बुधवारपेठेत जावे - खडसे
जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पक्षांतर केल्यापासून खडसे आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात अनेकदा शाब्दिक युद्धे रंगल्याचे जिल्हावासियांनी अनुभवले आहे. आता यात पुन्हा भर पडली असून या वाक् युद्धाला पुन्हा एकदा उकळी फुटली आहे. पण यावेळी युद्धाची सलामी मात्र गिरीश महाजन यांनी दिली आहे.
नेमक घडल काय...?
कोरोनाच्या (Corona) मुद्द्यावरून ‘नाथाभाऊंना ठाण्याला पाठवावे लागेल’ असे वक्तव्य शनिवारी (ता. ८) गिरीश महाजन यांनी केले होते. खडसेंनी त्यास जोरदार प्रत्युत्तर देत ‘मला तर ठाण्याला जाण्याची गरज नाही, परंतु गिरीशभाऊंना पुण्याच्या ‘बुधवार पेठे’त पाठवावे लागेल’ असे वक्तव्य केले. यामुळे आमदार महाजन व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यातला कलगीतुरा चांगलाच रंगला आहे.
हेही वाचा: खाकी वर्दीवर रक्ताचा डाग; मद्यधुंद अवस्थेत डिलिव्हरी बॉयला उडवलं
संधी कोणी सोडेना...
एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी हे दोन्ही नेते सोडत नाहीत. काही महिन्यांपूर्वी आ. महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या कोरोना अहवालावर ‘ईडीच्या तारखा पाहून खडसेंना कोरोना होतो’ अशी टीका केली होती. शनिवारी आ. गिरीश महाजन कोरोनाबाधित आल्यानंतर एकनाथ खडसेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली. खडसे म्हणाले, ‘मला तर खरोखर कोरोना झाला होता; परंतु सध्या मोक्का कायद्याची चौकशी होणार असल्याचे समजते. त्यामुळेच गिरीश महाजन यांना कोरोना झाला असावा असा मला संशय आहे’. त्यांच्या या वक्तव्यांचीही सर्वत्र चर्चा रंगली होती.
हेही वाचा: मोदी लाटेतही फुललं नाही कमळ, आता SP च्या बालेकिल्ल्याला भाजप लावणार सुरुंग?
Web Title: Eknath Khadse Criticized Girish Mahajan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..