Nashik News : पक्षांना नायलॉन मांजाचा बसू लागलाय फास

Nashik: Fire department personnel freeing a crow from a noose of nylon netting
Nashik: Fire department personnel freeing a crow from a noose of nylon nettingesakal

जूने नाशिक : संक्रांतीची चाहूल लागताच अनधिकृतरीत्या बाजारात विक्री होणाऱ्या नायलॉन मांजाचा पक्षांना फास बसू लागला. गुरुवारी (ता.२४) भद्रकाली पोलिस ठाणे आवारातील वडाच्या झाडात अडकलेल्या नायलॉन मांजामुळे दोन कावळ्यांना फास लागला.

त्यातील एकाने जीव गमावला अन दुसऱ्याला अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले. नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असली, तरीही नाशिकच्या बाजारात हा मांजा उपलब्ध आहे. दिल्ली, आग्रा, गुजरात आणि मुंबईहून खुलेआम नायलॉन मांजा शहरात विक्रीसाठी येतोय. (Nylon Manja Kill Birds and Harmful For Peoples Health Nashik Businessman Sale Manja hugely Manja import in Nashik from Mumbai Gujrat Nashik News)

Nashik: Fire department personnel freeing a crow from a noose of nylon netting
Nashik News : बांधकाम Online परवानग्यांमध्ये नाशिक राज्यात प्रथम

बाजारात मांजा विक्रीमध्ये नायलॉन मांजाचे प्रमाण ३० ते ४० टक्के असून संक्रांतीच्या काळात हेच प्रमाण ५० ते ६० टक्क्यांपर्यंत पोचते. त्यामुळे नायलॉन मांजावरील बंदीचे काय? असा गंभीर प्रश्‍न शहरवासीय उपस्थित करू लागले आहेत.

दरम्यान, भद्रकाली पोलिस ठाण्याच्या आवारात मांजाचा दोन कावळ्यांना फास लागला. पोलिस ठाण्याचा आवार आणि मदतकार्य करणारे महापालिकेचे अग्निशमन दल हे पाहता, नायलॉन मांजा विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी यंत्रणा नेमकी कुणाच्या आदेशाची वाट पाहत बसलीय? हा खरा प्रश्‍न आहे.

प्रतिबंधात्मक कारवाईचा फार्स

संक्रांतीच्या दोन महिने अगोदरपासून शहरात नायलॉन मांजा विक्री होतोय. पोलिस आणि वन विभाग बघ्याच्या भूमिकेत आहेत. राज्य सरकार अथवा जिल्हा प्रशासनाकडून येणाऱ्या आदेशाची वाट बघितली जाते. संक्रांतीच्या आठ दिवसासाठी आदेश जारी केला जातो. त्यावेळेत एखाद्या-दुसऱ्या विक्रेत्यावर पोलिस अथवा वन विभागाकडून कारवाई करण्यात येते. औपचारिकता म्हणून ती कारवाई असते काय? गंभीर स्वरूपाची कारवाई केली असती, तर आतापर्यंत नायलॉन मांजा विक्री बंद झाली असती, असे शहरवासीयांचे म्हणणे आहे.

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Nashik: Fire department personnel freeing a crow from a noose of nylon netting
Rajya Natya Compition : कसब पणाला लावून उभा केला ‘गावगाडा’

मुळातच, बाजारात नायलॉन मांजाची खुलेआम विक्री चाललीय. त्यामुळे मांजा शहरात येतो कसा? त्यावर अद्याप चिंतन होत शंभर टक्के प्रतिबंधाची दिशा का निश्‍चित होत नाही? असे प्रश्‍न उपस्थित होत असून शहरवासीयांच्या म्हणण्यानुसार नायलॉन मांजा येण्याचे मार्ग शोधून बंद केल्यास शहरात मांजा विक्रीस येणे बंद होईल.

‘ऑन कॉल’घ्या मांजा

बेकायदेशीररीत्या नायलॉन मांजा विक्री करणारे पोलिस आणि वन विभागाच्या हातावर तुरी देत मांजा विक्री करताहेत. त्यांच्या दुकानावर पतंगप्रेमी नायलॉन मांजा खरेदीस गेला की, त्यास सर्वांसमोर नकार दिला जातो. दरम्यान, त्यास व्हिजिटिंग कार्ड’ अथवा मोबाईल क्रमांक देऊन संपर्क करायला सांगितले जाते. दोघांमध्ये संवाद होताच, एखादी जागा निश्चित करून त्याठिकाणी नायलॉन मांजा विक्री केली जाते. ‘ऑन कॉल’ मांजा विक्रीबद्दल यंत्रणेला माहिती नाही काय? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.

Nashik: Fire department personnel freeing a crow from a noose of nylon netting
Credai Shelter 2022 : पहिल्याच दिवशी १५ हजार नागरिकांची प्रदर्शनाला भेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com