Nashik News : निरीक्षण- बालगृहातील बालकांनी लुटला सर्कशीचा आनंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Circus

Nashik News : निरीक्षण- बालगृहातील बालकांनी लुटला सर्कशीचा आनंद

नाशिक : सर्कस म्हटली, की बच्चे कंपनीला मोठे आकर्षण असते. त्र्यंबक रोडवरील सिंचन भवनाजवळ असलेल्या निरीक्षण व बालगृहातील बालकांनी सर्कशीचा आनंद लुटला. एशियाड सर्कसचा शो या बालकांना मोफत दाखविण्यात आला, सर्कसमधील कलाकारांच्या कसरती आणि विदूषकाच्या करामती बघून निरीक्षण गृहातील बालकांनी टाळ्या वाजवीत आनंद व्यक्त केला. (Observation children in childrens home enjoy of circus Nashik News)

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

नाशिक शहरात सध्या डोंगरे वसतिगृह मैदानावर देशातील नावाजलेली मूळ कानपूरमधील एशियाड सर्कस सुरू आहे. या सर्कशीमध्ये अवघ्या दीड फुटाच्या काचेच्या पेटीमध्ये बंद होणारी वीस वर्षांची तरुणी, मौत का कुआँ, ६० फुटी उंच झोक्यावर अंधारात झुलणाऱ्‍या तरुणी,

सायकलिंग, डान्स, फायर डान्स आणि नजरेला खिळवून ठेवतील, अशा जिम्नॅस्टिकच्या अंगभूत कसरती, सोबतच अवघ्या दीड फुटी जोकरची हास्य धमाल येथे अनुभवायला मिळाल्याने निरीक्षण गृह आणि बालगृहातील मुलामुलींनी कधी आश्‍चर्य व्यक्त केले.

निरीक्षण गृह व बालगृहातील बालकांना हा शो मोफत दाखविण्यात आला. यासाठी एशियाड सर्कसचे वरिष्ठ व्यवस्थापक अंकलेश्वर भास्कर, संचालक राजू खान आणि स्थानिक व्यवस्थापक सुंदर खरात यांनी सहकार्य केले. या वेळी निरीक्षण गृहाचे सचिव चंदुलाल शाह, निरीक्षण गृहाचे संचालक हितेश शाह उपस्थित होते.

टॅग्स :Nashikchildren