Nashik News : नाशिक रोडच्या नावलौकीकाला बाधा

उत्तर महाराष्ट्राचे प्रशासकीय केंद्र असलेल्या नाशिक रोडमध्ये सेंट्रल जेल, सैन्यदल भरती प्रशिक्षण केंद्र, महावितरण कार्यालय, स्काडा, रेल्वेस्थानक, इरीन, करन्सी नोट प्रेस व इंडिया सिक्युरीटी प्रेस ही महत्त्वाची केंद्र व राज्य सरकारची प्रमुख कार्यालये आहेत.
Nashik Road railway station News
Nashik Road railway station Newsesakal

Nashik News : उत्तर महाराष्ट्राचे प्रशासकीय केंद्र असलेल्या नाशिक रोडमध्ये सेंट्रल जेल, सैन्यदल भरती प्रशिक्षण केंद्र, महावितरण कार्यालय, स्काडा, रेल्वेस्थानक, इरीन, करन्सी नोट प्रेस व इंडिया सिक्युरीटी प्रेस ही महत्त्वाची केंद्र व राज्य सरकारची प्रमुख कार्यालये आहेत.

नाशिक शहरातील अधिकतम सरकारी कर्मचारी नाशिक रोड भागात कार्यरत आहे. शासन यंत्रणेचे प्रमुख केंद्र व भविष्यातील नाशिकचे बिझनेस सेंटर म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या नाशिक रोडच्या नावलौकीकाला एमडी ड्रग्जच्या कारखान्यामुळे बाधा निर्माण झाली. ही बाधा २०२४ च्या वर्षात पुसण्याचे आव्हान राहणार आहे.- हर्षवर्धन बोऱ्हाडे (Obstruction to reputation of Nashik Road nashik news)

नाशिक महापालिकेची स्थापना होत असताना नाशिक रोड- देवळाली नगरपालिकेचा समावेश महापालिकेत झाला असे असले तरी नाशिक रोडने स्वतःचे नाव टिकून ठेवले आहे. नाशिक रोडला स्वतःची ओळख आहे, ती सरकारी नोकऱ्यांचे केंद्रस्थान म्हणून. सर्व जातीधर्माच्या लोकांना कवेत घेऊन गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या नाशिक रोडला सामाजिक व सांस्कृतिक केंद्र म्हणूनदेखील मान्यता मिळाली आहे.

नाशिक रोड रेल्वेस्थानक तसेच देवळाली कॅम्प, भगूरपासून नांदूर नाका सिग्नल व शिंदे-पळसे गावापर्यंतचा भाग नाशिक रोड म्हणूनच ओळखला जातो. भविष्यात नाशिक- पुणे रेल्वे रेल्वे मार्गाचे महत्त्वपूर्ण स्थानक व नाशिक पुणे महामार्गाचे प्रवेशद्वार असल्याने नाशिक रोडचे महत्त्व वाढणार आहे. त्यातच सिन्नर औद्योगिक क्षेत्राचा विस्तार वाढत असल्याने नाशिक व सिन्नर ही दोन महत्त्वाची शहरे जोडण्यास अवघ्या काही वर्षांचा कालावधी शिल्लक आहे.

नाशिक रोड विकासाचे महत्त्वपूर्ण टोक गाठत असताना 2023 या वर्षात एमडी ड्रग्जचा कारखाना मुंबई पोलिसांना उद्ध्वस्त करण्यात यश आल्याने नाशिक रोडच्या नावलौकिकाला बट्टा लागला. नाशिक रोडला लागलेला हा काळा डाग भविष्यातील अनेक पिढ्यांना सोसावा लागणार आहे. त्या दृष्टीने 2023 हे वर्ष नाशिक रोडसाठी काळा अक्षरात लिहिण्यासारखे आहे.

एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त होणे ही टोकाची घटना आहे. त्यापूर्वी वर्षभरात छोट्या मोठ्या गुन्हेगारी कृत्यांनी नाशिक रोड गाजले. कोयता गॅंग हा शब्द नाशिक रोडमधूनच उदयाला आला. पुण्याची कोयता संस्कृती नाशिकमध्ये व विशेष करून नाशिक रोडमध्ये मोठ्या प्रमाणात रुजली. वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना घडू लागल्यानंतर नागरिकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली.

Nashik Road railway station News
Nashik News : दलितवस्ती सुधारणा अंतर्गत कामांच्या प्रशासकीय मान्यता रद्द?

उपनगर, देवळाली, रोकडोबावाडी विहीतगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने नाशिक रोड गुन्हेगारीचे प्रमुख केंद्र बनते की काय, अशी भीती निर्माण झाली. एकीकडे कोयते हातात घेऊन नाशिक रोडच्या नागरिकांना धमकविणारे कागदी वाघांचा सुळसुळाट झाला असताना खरे वाघदेखील नाशिक रोडमध्ये दिसू लागले.

गेल्या वर्षभरात चार ते पाच ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याने व काही ठिकाणी हल्ला झाल्याने नाशिक रोड बिथरले. शासकीय कार्यालयांचे केंद्रस्थान असल्याने येथे कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांबरोबरच काही काम चुकार व लाचखोर अधिकारीदेखील आहे. लाचलुचपतच्या धाडसत्रात असे अनेक लाचखोर पकडले गेले. हीदेखील बाब नाशिक रोडच्या नावलौकिकाला बाधा निर्माण करणारी ठरली.

राजकीय उलथापालथ

वर्षाच्या सुरवातीला शिवसेनेच्या येथील बालेकिल्ल्याला मोठा धक्का बसला. शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या काही माजी नगरसेवकांनी शिवसेनेच्या शिंदे गटासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने नाशिक रोडच्या राजकारणात दोघांत तिसरा अशी परिस्थिती निर्माण झाली.

नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेने सहकारात मानाचे स्थान मिळविले आहे. अर्थवाहिनी असलेल्या या बँकेची निवडणूक या वर्षी पार पडली. यात सत्ताधारी पॅनलने पाचव्यांदा निर्विवाद वर्चस्व मिळविले. नाशिक रोडचा विकास होत असताना काही महत्त्वाचे प्रश्न मात्र अनुत्तरित राहिले. त्यामध्ये वाहतुकीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा असलेल्या दत्तमंदिर ते द्वारका डबलडेकर उड्डाणपुलाचे नारळ फुटले. मात्र तो पूल अद्यापही कागदावरच आहे.

दत्तमंदिर ते द्वारका या दरम्यान महामार्गावर डांबराचे थर मारले गेले, मात्र पावसाळ्यात या रस्त्याच्या कामांची गुणवत्ता उघड पडली. नाही म्हटले तरी नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू झाल्याने अनेकांना रोजगाराचे साधन प्राप्त झाले. उड्डाणपुलाखालील अतिक्रमण व नाशिक रोड रेल्वेस्थानक परिसरात असलेले अतिक्रमण ही डोकेदुखी या वर्षीदेखील कायम राहिली. उपनगर चौफुली व बिटको महाविद्यालयासमोरील वाहतूक कोंडीची केंद्रे बनले.

Nashik Road railway station News
Nashik News : निधी खर्चासाठी यंत्रणांची धावपळ; प्रस्ताव पाठवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com