ओझर शहराला नगर परिषदेचा दर्जा; शासनाच्या नगर विकास विभागाची अधिसूचना 

ojhar
ojhar
Updated on

पिंपळगाव बसवंत, ओझर (नाशिक) : निफाड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील ओझर शहरला नगर परिषदेचा दर्जा शासनाच्या नगर विकास विभागाने अधिसूचना जारी करत दिला आहे. उद्‍घोषणेनंतर ३० दिवसांपर्यंत निर्णयावर नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती नोंदविता येणार आहेत. ग्रामपंचायत बरखास्त करून नगर परिषदेचा दर्जा मिळणार असल्याने ओझरसाठी शासनाकडून भरीव निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकाऐवजी आता नगर परिषदेचा रणसंग्राम रंगताना दिसेल. 

नागरिकांकडून जोरदार स्वागत

सुमारे ६० हजार लोकसंख्येची ग्रामपंचायत असलेल्या ओझरला यापूर्वी २००७ मध्ये शासनाने नगर परिषदेबाबत दर्जा बहला केला होता; पण राजकीय कुरघोडीत तो आदेश रद्दबातल ठरला. सर्व निकषांत बसत असताना व शासनदरबारी फाइल परिपूर्ण असतानाही निर्णय होत नव्हता. माजी आमदार अनिल कदम यांनी सहा महिन्यांपासून नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून अखेर ओझरला नगर परिषद गठीत करण्याच्या निर्णयावर अंतिम मोहोर उमटवली. बहुप्रतिक्षित निर्णय झाल्याने ओझर शहरातील नागरिकांनी याचे जोरदार स्वागत केले आहे. 

तालुक्यातील  दुसरी नगर परिषद

निफाडनंतर तालुक्यात ओझर ही दुसरी नगर परिषद असेल. ओझर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून वेतन मिळेल. तर ओझर ग्रामपंचायत सदस्य मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपून निवडणुकीचे पडघम वाजले होते. ग्रामपंचायत सदस्याऐवजी आता नगरसेवक, असा दर्जा वॉर्ड प्रतिनिधींना मिळेल. शिवाय सदस्यांपेक्षा नगरसेवकांची संख्याही वाढणार आहे. यामुळे सत्ता प्राप्तीसाठी माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, त्यांचे चुलतबंधू यतीन कदम, शहर विकास आघाडीसह भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे असा पक्षीय रंग निवडणुकीला येणार आहे. शहरातील पारंपरिक वॉर्डाचे विभाजन होणार असल्याने इच्छुकांना नव्याने मोर्चेबांधणी करावी लागेल. महत्त्वाचे म्हणजे ओझर गटाचे यतीन कदम यांच्या जिल्हा परिषद, तर गणातील दोन पंचायत समिती सदस्यांच्या पदांवर टांगती तलवार या निर्णयामुळे आली आहे. 

असे असेल नगर परिषदेचे कार्यक्षेत्र 

पूर्व दिशा - ओझर गावाची व बाणगंगा नगर गावाची पूर्वेकडील सीमा, पश्चिम दिशा- ओझर गावाची दक्षिणेकडील सीमा, दक्षिण दिशा- ओझर गाव, अमृतनगर व विजयनगर गावाची दक्षिणेकडील सीमा, उत्तर-एच.ए.एल मिग कारखान्याच्या वायव्य टोकापासून मोहाडी शिवकेडील पूर्व-पश्‍चिम भाग. 
 

ओझर या कर्मभूमीने माझा राजकीय उदय केला. तिचे ऋण विकासातून फेडण्यासाठी आमदारपदाच्या माध्यमातून त्या वेळी प्रयत्न केले. हा दर्जा मिळविताना कोणताही राजकीय व्देष नाही. ओझरला विकासाच्या माध्यमातून उंचीवर नेण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय शासनमान्य करून आणला आहे. 
-अनिल कदम, माजी आमदार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com