
नाशिक : ग्रामीण भागातील जुने कोंडवाडे पडद्याआड
अंबासन (जि. नाशिक) : अरे...शेतात जनावरे कुणाची...पकडा त्यांना शेतीचे नुकसान केलय...टाका कोंडवाड्यात...! कधीकाळी शेतात मोकाट सोडलेली जनावरे (Animals) दिसली की गावात कोंडवाड्यात टाकली जात होती आणि मालकाला दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. जसजसा काळ बदलत गेला यांत्रिकीकरण (Mechanization) आले आणि पाळीव जनावरे कमी झाली त्यात गावाच्या वेशीवरील कोंडवाडे पडद्याआड होत गेली. ग्रामीण भागातील बहुतांश कोंडवाड्यांची जागाच मात्र हडप झाल्याचे चित्र आहे. (old Kondwada ignored Nashik News)
पुर्वी ब्रिटिश काळात शेतसारा वसूल केला जात होता तेव्हा शासनाकडून मुक्तीर (मुनीमजी) काम पहात होते. शेतीपिकांची निगराणी करण्यासाठी सालगडी ठेवले जात होते. त्यावेळेस त्यांना फक्त वर्षाकाठी प्रत्येक शेतकऱ्यांकडून ठरल्याप्रमाणे धान दिले जात होते. शेतीपिकांचे नुकसान होऊ नये यासाठी ग्रामीण भागातील वेशीजवळ बंदिस्त कोंडवाडे बांधलेली होती बहुतांश भागात आजही सुस्थितीत दिसून येतात. शेतीपिकांत एखाद्या मालकाच्या जनावराने नुकसान केले तर त्याला पकडून कोंडवाड्यात डांबून ठेवले जात होते. दरम्यान मालकाकडूनही दंडात्मक कारवाई करीत भरपाई घेतली जात होती.
हेही वाचा: दीड एकरवर आधुनिक रेशीम शेती; वर्षाला 8-9 लाखांचे विक्रमी उत्पन्न
मात्र जसजसा काळ बदलला यांत्रिकीकरण झपाट्याने वाढत गेले आणि घराघरातील दावणला बांधलेली जनावरे कमी होत गेली. आजमितीस बोटावर मोजण्याइतकेच जनावरे निदर्शनास येतात. दरम्यान जनावरांना ऐन उन्हाळ्यात चाराही दुरापस्त होत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. ग्रामीण भागातील बहुतांश कोंडवाडे आजही सुस्थितीत दिसू येत आहेत. कोंडवाडे कुणाच्या मालकीचे होण्याआधीच प्रशासनाने याकडे लक्ष घालुन व्यायाम शाळा किंवा गाव तिथे वाचनालय बांधण्याची काळाजी गरज आहे.
हेही वाचा: Nashik : नर्सिंग महाविद्यालयात आढळून आले विषारी नाग-नागिण
"काळानुरूप बदल झाला आणि जुन्या काळातील कोंडवाडे पडद्याआड झाले. ज्या ठिकाणी आजही सुस्थितीत जुने कोंडवाडे आहेत तेथे प्रशासनाने दखल घेऊन युवा वर्गासाठी वाचनालय किंवा व्यायाम शाळा बांधावी."
- केवळ देवरे, सामाजिक कार्यकर्त करंजाड.
Web Title: Old Animal Cages Ignored Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..