Leopard
sakal
जुने नाशिक: गडकरी चौक येथे विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या कार्यालय आवारात शुक्रवारी सकाळी बिबट्याचा वावर आढळून आला होता. पोलिस आणि वन विभागाकडून शोध घेऊनही तो मिळून आला नाही. घटनेस २४ तासांपेक्षा अधिक कालावधी लोटला असूनही बिबट्या अजूनही आढळून आला नाही. वन विभागाचे मात्र सतत सर्च ऑपरेशन सुरू आहे.