Nashik News: जुन्या गंगापूर नाका सिग्नलच्या वेळेत वाढ! रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीला अडथळा

Traffic Signal
Traffic Signalesakal

Nashik News : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. परंतु यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते आहे.

जुना गंगापूर नाका सिग्नलच्या चोपडा लॉन्सकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असून, यामुळे कोंडी होऊन सिग्नल यंत्रणाच कोलमडून पडते. यासाठी या सिग्नलच्या वेळेत १५ सेकंदाने वाढ करण्यात आलेली आहे.

परंतु, यामुळेही कोंडीची समस्या सुटलेली नाही. त्यामुळे पर्यायी उपाययोजना करण्याची आवश्‍यकता व्यक्त होते आहे. (Old Gangapur Naka signal time increase Traffic disruption due to road works Nashik News)

स्मार्ट सिटी प्रकल्पात नाशिक शहराचा समावेश आहे. त्याअंतर्गत शहरातील ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. परंतु अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या या कामांचा विपरीत परिणाम होत असून त्याचा हकनाक त्रास सर्वसामान्यांना होतो आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गतच गंगापूर रोडवरील जुना गंगापूर नाका सिग्नल येथील चोपडा लॉन्समार्गे पंचवटीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. अत्यंत संथगतीने या कामाची प्रगती होते आहे.

मात्र, यामुळे सिग्नल यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडतो आहे. या सिग्नलवरून पंचवटी, गंगापूर, अशोकस्तंभ व कॅनडा कॉर्नरकडे वाहने जाऊ शकतात. या रस्त्यावर शहरातील शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक दुकाने आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Traffic Signal
Nashik News: तहसीलदार राजश्री गांगुर्डेंना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस

त्यामुळे या मार्गावर रहदारी मोठ्याप्रमाणात असते. मात्र, सिग्नलवरून चोपडा लॉन्समार्गे पंचवटीकडे जाण्यासाठी रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनांसाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे सिग्नलवरील कोणताही सिग्नल सुटला आणि चोपडा लॉन्सकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यास सिग्नल यंत्रणा कोलमडून पडते.

यावर शहर वाहतूक शाखेने सिग्नलच्या वेळेत १५ सेकंदांचा अवधी वाढविला आहे. आता या ठिकाणी थांबण्यासाठीची वेळ १३६ सेकंदाची आहे. तर, चोपडा लॉन्सकडून येणाऱ्या वाहनांसाठी १५ सेकंदाची वेळ वाढविण्यात आलेली आहे. ४० सेंकद जाण्यासाठी अवधी देण्यात आला आहे.

"जुना गंगापूर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी येथील सिग्नलच्या वेळेत काही सेकंदाने वाढ केली आहे. त्याचप्रमाणे शहरातील अन्यही काही सिग्नलचा आढावा घेऊन त्यानुसार तेथील वेळेत बदल करण्यात येईल."

- सचिन बारी, सहायक पोलिस आयुक्त, शहर वाहतूक शाखा

Traffic Signal
Nashik News: प्रवेशद्वारावरील मुख्य रस्ता दोऱ्या लावत बंद! बाजार समितीतील दुकानदारांचे आंदोलन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com