HR-CT स्कोर 19 त्यात न्युमोनिया; तरीही आजींची कोरोनावर मात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

covid fighter rangubai gaykwad

HR-CT स्कोर 19 त्यात न्युमोनिया; तरीही आजींची कोरोनावर मात!

मालेगाव (जि. नाशिक) : येथील महापालिकेच्या मसगा महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये(covid centre) रंगुबाई गायकवाड या ५९ वर्षीय वृध्देने गंभीर आजार असताना कोरोनावर(corona) यशस्वी मात केली. (Grandmother beat Corona despite a HR-CT score is 19)

जगण्याची जिद्द कायम

रंगुबाई कोरोना पॉझिटिव्ह(corona positive) येण्यापूर्वीच त्यांना अनेक गंभीर आजाराने ग्रासले होते. कोरोनाग्रस्त होण्यापूर्वी त्यांना डायबिटीज(diabetes), हायपर टेन्शन(blood pressure), थायरॉईड(thyroid), गंभीर किडनी रोग(kidney diseases), ८० टक्के निमोनिया(pneumonia) आणि टायफॉईड(typhoid) असे आजार होते. त्यांचा एचआर सिटी(HR-CT) स्कोर २५ पैकी १९ होता, अशी माहिती त्यांचे पुत्र चंद्रकांत व मसगा कोविड सेंटरचे नोडल अधिकारी डॉ. ऋषिकेश साळुंखे यांनी दिली. सर्व आजारांसह कोरोनाग्रस्त असताना जास्त रिस्कच्या कारणास्तव त्यांना दाखल करुन घेण्यास इतर रुग्णालयांनी असमर्थता दर्शवली. अशा वेळी त्यांना मसगा कोविड सेंटरमध्ये २७ एप्रिलला दाखल करुन घेण्यात आले. रंगुबाईंनी कोरोना उपचाराला पहिल्या दिवसापासून प्रतिसाद दिला. कोविड सेंटरचे प्रमुख डॉ.ऋषिकेश साळुंखे यांनी सांगितले की, रंगुबाईंना विविध आजारांनी ग्रासले होते. कोमार्बिड क्रिटिकल पेशंट असलेल्या रंगुबाईंचा स्कोर १९ असल्याने मोठी रिस्क घेऊन हिंमतीने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांनी उपचाराला सकारात्मक प्रतिसाद दिला. मसगा कोविड सेंटरमधील सर्व वैद्यकीय सहकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे त्यांनी कोरोनावर यशस्वी मात(beat the corona) केली. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. सध्या मसगा कोविड सेंटरमध्ये ८१ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांचा उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, सहाय्यक आयुक्त तुषार आहेर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांना घरी सोडण्यात आले.

हेही वाचा: हापूस आंब्याचा सेल! अशी नोंदवू शकता ऑर्डर

यांची होती उपस्थिती

या वेळी नगरसेवक मदन गायकवाड, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रेय काथेपुरी, सेंटरचे नोडल अधिकारी ऋषिकेश साळुंखे, इन्चार्ज सिस्टर विनया भालेकर, कुणाल सूर्यवंशी, लॅब टेक्निशियन अमोल हिरे, फार्मासिस्ट डिंपल पाटील, कुणाल पाटील, वॉर्डबॉय, रुग्णवाहिका चालक यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. कोविड सेंटरच्या व्यवस्थापनाची जबाबदारी भारत भांडारकर यशस्वीपणे सांभाळत आहेत.

हेही वाचा: यंदाही बारगळणार CET परीक्षांचे वेळापत्रक; विद्यार्थ्यांना ‘तारीख पे तारीख!

Web Title: Old Lady Beat Corona Nashik Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top