Nashik Celebration
sakal
नाशिक: महिला क्रिकेट विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्याचा थरार नाशिककरांनी रविवारी (ता. २) अनुभवला. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या या सामन्यात सामना हातातून जातो की काय, अशीही एक वेळ आली होती. मात्र, भारतीय महिलांनी अतिशय संयमी खेळी करीत अटीतटीच्या सामन्यात विजयाचे पारडे भारताच्या बाजूने झुकविले अन सर्वत्र एकच जल्लोष सुरू झाला.