esakal | सप्तपदीही झाली...अन् नवरीला सोडून नवरदेवाचे वर्‍हाडी फिरले माघारी...बातमी समजल्यावर मंडळींना मोठा धक्का
sakal

बोलून बातमी शोधा

saptpadi.jpg

नाशिकरोड जवळील पळसे परिसरातील कारखाना रोड परिसरात आज (दि.२८) लग्न ठरले. तर बुधवारी (दि.२७) संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम सुरु झाला आणि याचवेळी नवरदेवाच्या मोठ्या भावाबद्दल धक्कादायक बातमी आल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे वर्‍हाडी मंडळींमध्ये भितीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले. यानंतर लग्न लावून सप्तपदी तर पूर्ण केली. मात्र वधूला बरोबर न घेताच नवरदेव आपल्या घरी परतले.अशा परिस्थितीत प्रत्येकाने लग्न घरातून काढता पाय घेतला.

सप्तपदीही झाली...अन् नवरीला सोडून नवरदेवाचे वर्‍हाडी फिरले माघारी...बातमी समजल्यावर मंडळींना मोठा धक्का

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकरोड जवळील पळसे परिसरातील कारखाना रोड परिसरात आज (दि.२८) लग्न ठरले. तर बुधवारी (दि.२७) संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम सुरु झाला आणि याचवेळी नवरदेवाच्या मोठ्या भावाबद्दल धक्कादायक बातमी आल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे वर्‍हाडी मंडळींमध्ये भितीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले. यानंतर लग्न लावून सप्तपदी तर पूर्ण केली. मात्र वधूला बरोबर न घेताच नवरदेव आपल्या घरी परतले.अशा परिस्थितीत प्रत्येकाने लग्न घरातून काढता पाय घेतला.

बातमी समजताच वऱ्हाडी फिरले माघारी

शिलापूर येथील युवकाचे लग्न नाशिकरोड जवळील पळसे परिसरातील कारखाना रोड परिसरात आज (दि.२८) ठरले होते. बुधवारी (दि.२७) संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम सुरु झाला आणि याचवेळी नवरदेवाच्या मोठ्या भावाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. नवरदेवाचा भाऊ कोरोनाबाधित असल्याचे समजताच वर्‍हाडी मंडळींमध्ये भितीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले. अशा परिस्थितीत प्रत्येकाने लग्न घरातून काढता पाय घेतला. नवरदेवाच्या भावाच्या संपर्कात आलेल्या सर्वांचीच तपासणी होणार असल्याने नवरदेवालाही क्वारंटाईन व्हावे लागणार असल्याने गुरुवारी(ता.२८)  सकाळी अवघ्या पाच-सहा लोकांच्या साक्षीने वधू-वरांनी सप्तपदी करून घेतली. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सप्तपदी झाल्यावर वधूला बरोबर न घेताच नवरदेव आपल्या घरी परतले.

हेही वाचा >  अपुऱ्या पोलीसांच्या मनुष्यबळामुळे शिक्षकाला चेकपोस्टवर लावली ड्युटी.. अन् चेकपोस्टवरच मोठा अपघात

विवाह जरी पार पडला असला तरी शासकीय यंत्रणा मात्र सतर्क
नवरदेवाच्या भावाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती ऐन हळदीचा कार्यक्रम सुरु असताना मिळाली आणि वर्‍हाडी मंडळीच्या अंगावर काटा उभा राहिला. अखेर गुरुवारी सकाळी सात वाजताच पाच-सहा लोकांच्या साक्षीने सप्तपदी झाली. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सावधगिरीचे पाऊल उचलत वर्‍हाडी मंडळी नवरीला न घेताच आपल्या घरी परतल्याची घटना नाशिकरोड जवळील पळसे येथे घडली. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या भावाचा विवाह जरी पार पडला असला तरी शासकीय यंत्रणा मात्र सतर्क झाली आहे. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी पथक, पोलीस, महसूल अधिकारी, प्रशासकीय पातळीवर माहिती घेणे सुरु केले आहे. 

हेही वाचा > ''तिच्या आईवडिलांनी आमच्या लग्नाला परवानगी नाकरली.. म्हणूनच मी तिच्यासोबत.. ''..माथेफिरू युवकाची धक्कादायक जबानी

loading image
go to top