Nashik : एका दिवसात विवाह सोहळ्याची पद्धत सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wedding Ceremony

Nashik : एका दिवसात विवाह सोहळ्याची पद्धत सुरू

येसगाव (जि. नाशिक) : कोरोनाच्या काळात दोन वर्षे खंड पडल्याने सध्या विवाह सोहळे मोठ्या प्रमाणात आहेत. ग्रामीण भागात शेतकरी, मजूर, कामगार व इतर व्यावसायिक पावसाळ्यापूर्वी विवाह सोहळा आटोपतात. शेतातील इतर कामे व भगवा कांदा काढण्याची धूम चालू आहे. एका घरात कामासाठी चार-पाच व्यक्ती कामाला जातात. अनेकांना किमान तीनशे ते चारशे रुपये रोज पडत आहे. त्यातच विवाह मुहूर्त मोठ्या प्रमाणात आहेत. विवाहसोहळा (Wedding Ceremony) म्हटला म्हणजे तीन दिवस सहज लागतात. (One day wedding ceremony begins in Yesgaon Nashik Wedding News)

पहिल्या दिवशी मेहंदी, दुसऱ्या दिवशी सकाळी मांडव व सायंकाळी हळद, तिसऱ्या दिवशी शुभमंगल होते. मेहंदी ते लग्न लागेपर्यंत नातेवाईक मित्रमंडळी भाऊबंदकी हजेरी लावण्याची पद्धत सुरू झाली आहे. या सर्वांना फाटा देत येसगाव खुर्द येथे अनेकांनी एका दिवसात विवाह सोहळा करण्याची पद्धत सुरू केली. त्याप्रमाणे बरेच विवाह एका दिवसात (One Day Wedding) झालेत व होऊ लागले आहेत. त्यामुळे वेळेची व पैशांची बचत होऊ लागली आहे. विवाह पटांगणात किंवा शाळेच्या आवारात पार पडतात. सकाळी मांडव, दुपारी देव आणने, देवांचे लग्न, इतर लग्न संबंधित कार्यक्रम, त्यानंतर सायखेडा सायंकाळी हळद व रात्री विवाह संपन्न होऊ लागले आहेत.

हेही वाचा: नाशिक : कसारा घाटात दुधाच्या टँकरला आग

४२ ते ४३ अंश उन्हाचा पारा अंगाची लाहीलाही करत आहे. विवाह गोरज मुहूर्तावर ठेवल्यामुळे भर दुपारी महिला, लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना तीव्र उन्हापासून बचाव होतो. कामावर जाणाऱ्या निमंत्रितांना रात्रीच्या विवाहाचा आनंद लुटता येतो. बऱ्याच वेळा नवरी उचलून आणतात; म्हणजे नवरदेवाच्या गावात विवाह होणे. अशा प्रकारे लग्नासाठी वेळेचे नियोजन बिघडत नाही. रात्री पंगतीसाठी उजेडाची व्यवस्था राहते. प्रसंगी गावातील सभामंडपात जेवणाची व्यवस्था केली जाते. एका दिवसात विवाहाची सुरवात पहिल्यांदा सुंदरलाल शेलार यांच्या मुलाच्या विवाहापासून झाली. त्यानंतर कैलास शेलार व समाधान महाले यांच्या मुलांचे तसेच, संजय बागूल यांच्या कन्येचा विवाह सोहळा याच पद्धतीने करण्यात आला. याप्रमाणे विवाह सोहळा करणे काळाची गरज आहे, अशी चर्चा होत आहे. पुढील विवाह सोहळे करण्यास अनेक परिवाराकडून प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा: Nashik : दिंडोरी तालुक्यातील 2 विद्यार्थ्यांना कृत्रिम हात

उन्हापासून बचाव

वेळेअभावी विवाहात वरमाई बंद. व्याह्यांव्यतिरिक्त सत्कार नाही. लग्नाआधी जेवणास सुरवात महिलांनाही प्राधान्य. वाजंत्री एका दिवसापुरती. वेळेवर लग्न, वाद्यांच्या तालावर थिरकने कमी. लग्नाचे आमंत्रण मोबाईलवर, लग्नपत्रिका छापणे व वाटणे बंद. गोरज मुहूर्त, वऱ्हाडी मंडळींना उन्हापासून बचाव.

Web Title: One Day Wedding Ceremony Begins In Yesgaon Nashik Wedding News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikwedding ceremony
go to top