पुणे विद्यापीठाच्‍या परीक्षा शंभर टक्‍के अभ्यासक्रमावर

ऑनलाइन परीक्षेत वस्‍तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्‍नांचा समावेश
Pune University
Pune UniversitySakal

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्‍या प्रथम सत्रातील पदविका, पदवी, व पदव्‍युत्तर अभ्यासक्रमांची परीक्षा ऑनलाइन स्वरूपात(online exam) होणार आहे. फेब्रुवारी, मार्चमध्ये नियोजित या परीक्षेत वस्‍तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्‍न विचारले जातील. सत्रातील शंभर टक्‍के अभ्यासक्रमावर प्रश्‍न विचारले जाणार असल्‍याचे विद्यापीठातर्फे(pune university) स्‍पष्ट केले आहे.

यासंदर्भात विद्यापीठाने मार्गदर्शक तत्त्वे व सूचना जारी केले आहेत. विद्यापीठ अधिकार मंडळाने(University Authority Board) घेतलेल्‍या निर्णयानुसार या परीक्षा टप्‍याटप्‍याने फेब्रुवारी, मार्चमध्ये ऑनलाइन पद्धतीने घेतल्‍या जातील. परीक्षेचे वेळापत्रक (exam timetable)टप्‍याटप्‍याने जारी केले जाणार आहे. वेळापत्रकात परीक्षांसाठीचा एकूण कालावधी दोन तासांचे एक सत्र असा जरी नमूद केला असला तरी दिलेल्‍या कालावधीत परीक्षा ही एक तासाची असेल. प्रत्‍यक्ष विद्यार्थ्याने लॉगइन केल्‍यानंतर प्रश्‍नपत्रिका सोडविण्यासाठी एक तासाचा कालावधी असेल असे विद्यापीठातर्फे स्‍पष्ट केले आहे. ऑनलाइन परीक्षेत काही तांत्रिक कारणाने खंड पडल्‍यास उर्वरित राहिलेलाच वेळ विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअरमार्फत आपोआप वाढवून दिला जाईल. यापूर्वी सोडविलेली उत्तरे ही आपोआप सेव्‍ह होऊन परीक्षा पुन्‍हा राहिलेल्‍या वेळासाठी सुरु होईल. दिव्‍यांग विद्यार्थ्यांना(handicap students) शासन नियमानुसार तीस मिनीटे अतिरिक्‍त वेळ दिला जाईल. परीक्षांची माहिती होण्यासाठी परीक्षा सुरू होण्यापूर्वी तीन दिवस आधी सराव परीक्षांचे आयोजन केले जाणार असल्‍याचेही विद्यापीठातर्फे नमुद केले आहे.

अशी असेल परीक्षेची रचना

परीक्षेत साठ बहुपर्यायी प्रश्‍नांमधून ५० अचूक प्रश्‍नांची उत्तरे ग्राह्य धरली जातील. विज्ञान, एफ.वाय. बीसीए व अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील(engineering) गणित व संख्याशास्‍त्र या विषयांसाठी एकूण तीस प्रश्‍न विचारले जातील. त्‍यातील २५ अचूक प्रश्‍नांची उत्तरे ग्राह्य धरली जाणार असल्‍याचे विद्यापीठाने(pune university) स्‍पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com