सुरगाणा : उंबरठाण येथील मरदेवी जवळील म्हैसखडक फाटा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. (one killed in bike accident nashik news)
नितीन ठाकरे हा डोल्हारे येथील युवक उंबरठाण येथून बजाज दुचाकी (एम एच १५,एच जे ४४९९) ने काठीपाडा कडे वेगाने येत होता. त्याच दरम्यान हिरो होंडा दुचाकी (जी. जे १५,एल एल ९६९५) ने हरीलाल बागुल व मनोहर चौधरी हे उंबरठाण कडे जात होते.
रस्त्यावर मोठे खड्डे असल्याने खड्डा टाळण्याच्या नादात नितीनचे दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत या हिरो होंडा दुचाकी वरील मागे बसलेले मनोहर मनाजी चौधरी (वय ५७ रा. चापावाडी) हे दूरवर फेकले गेले.
यामध्ये त्याचा पाय मोडला असून पोटातील आतडे तुटल्याने त्यास ग्रामीण जिल्हा रुग्णालय बलसाड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. तर हरीलाल यास गुडघ्याला व तळपायाला जखम झाली आहे. नितीन हा किरकोळ जखमी झाला आहे.
पोलीस हवालदार चौधरी हे अधिक तपास करीत आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर चापावाडी येथे रहात्या गावी ता.२२ शुक्रवारी वझरा नदीवर अंत्यसंस्कार होणार आहेत. दुसऱ्याला नेहमी संकट समयी मदत करणारे व्यक्तीमत्व हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.