

जुने नाशिक : द्वारका चौकात बुधवारी (ता.२०) दुपारी ग्रामीण पोलिसांचे वाहन कारवर धडकुन अपघात घडला.
दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पोलीस वाहनातील एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला. (Police vehicle collided with four wheeler Nashik Accident News)
ओझर येथून ग्रामीण पोलिसांचे वाहन (एमएच- १५- एचयू- ६२५६) द्वारकाच्या दिशेने परतत होते. त्यांच्यापुढे (एमएच- १५- जीएफ- ९९५१) चारचाकी जात होती. अचानक द्वारका चौकात चारचाकीचे मागील टायर फुटले.
त्यामुळे मागून येणाऱ्या पोलिसांच्या वाहनाने चारचाकीस जोरदार धडक दिली. पोलीस वाहनातील एअर बॅग उघडल्यामुळे चालक आणि सहकारी बचावले. सुदैवाने चारचाकीतीलही कुणास दुखापत झाली नाही.
अपघातामुळे काही वेळ द्वारका भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल झाले. अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.