भाज्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात; कांदा, बटाट्याचे दर मात्र अद्यापही तेजीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

potato onion prices.

गत महिन्यापर्यंत कोसळत असलेल्या पावसामुळे सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे मेथीची जुडी पन्नास रुपयांपर्यंत तर एरवी दहा-पंधरा रुपयांनाही महाग वाटणारी पालक, शेपूची जुडीही ३० रुपयांपर्यंत पोचली होती.

भाज्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात; कांदा, बटाट्याचे दर मात्र अद्यापही तेजीत

नाशिक/पंचवटी : दिवाळीमुळे भाजीपाल्याला फारशी मागणी नाही. तसेच ठिकठिकाणी आठवडेबाजार सुरू झाल्याने भाज्यांचे दर आटोक्यात आले आहेत. परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाल्याने गत आठवड्यापर्यंत भाज्यांच्या दराने मोठी उसळी घेतली होती. मात्र अद्यापही कांदा, बटाट्याचे दर तेजीतच आहेत. 

ठिकठिकाणी फुलले आठवडेबाजार 

सात महिन्यांपासून लॉकडाउनमुळे बंद असलेल्या गंगाघाट, देवळालीगावसह ठिकठिकाणचे आठवडेबाजार पूर्ववत झाले आहेत. पूर्ण क्षमतेने भरलेल्या बाजारात उलाढाल सुरू झाली. कोरोनामुळे हरविलेले वैभव पुन्हा दिसून आले. बाजारात अन्य विक्रेत्यांपासून गावातील शेतकरीही मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने नागरिकांना स्वस्त, हिरवा व ताजा भाजीपाला उपलब्ध होऊ लागला आहे. भाजीपालाच नाहीतर तयार कपडे, सर्व प्रकारचे धान्य, मसाल्याचे पदार्थ विक्रीसाठी भगूर, देवळाली, पांढुर्ली, गिरणारे, दिंडोरी, आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद आदी ठिकाणांहून विक्रेत्यांचा आठवडे बाजारांत राबता वाढला आहे. 

हेही वाचा >  भाजप नेत्याच्या वाढदिवसाचा भररस्त्यात जल्लोष! पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

कांदा, बटाट्याची तेजी टिकून 

गत महिन्यापर्यंत कोसळत असलेल्या पावसामुळे सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे मेथीची जुडी पन्नास रुपयांपर्यंत तर एरवी दहा-पंधरा रुपयांनाही महाग वाटणारी पालक, शेपूची जुडीही ३० रुपयांपर्यंत पोचली होती. मात्र काल बाजारातील मोठ्या आवकेनंतर कोथिंबीर, मेथीसह पालक, शेपू या पालेभाज्या अवघ्या दहा रुपयांत उपलब्ध होत होत्या. यशिवाय वांगी, टोमॅटोसह कारली, गिलके, दोडके तीस ते चाळीस रुपये दर होता. मात्र चांगल्या दर्जाचा कांदा ७० ते ८०, तर बटाट्याने पन्नास रुपयांपर्यंत उसळी घेतली होती. 

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

loading image
go to top