Nashik Onion News : केंद्राच्या पथकाकडून बांधावर येत कांदा पाहणी; 3 गावांत शेतकऱ्यांशी साधला संवाद

दाच्या दुष्काळी स्थितीमुळे कांदा उत्पादन कमी होण्याचा अंदाज असल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली.
A team of the Center inspecting the onion crop at the farmer's dam in Vani Kasbe on Thursday.
A team of the Center inspecting the onion crop at the farmer's dam in Vani Kasbe on Thursday.esakal

Nashik Onion News : यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे कांदा उत्पादन कमी होण्याचा अंदाज असल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली. मात्र कांद्याचे भाव तुलनेने कमी होत असल्याने त्वरित निर्यात बंदी उठवण्याची मागणी होत आहे.

यामुळे केंद्र शासनाने कृषी मंत्रालय, ग्राहक मंत्रालय व बागवणी बोर्डाचे केंद्रीय पथक तातडीने राज्यात पाठवले असून गुरुवारी (ता.८) पथकाने दिंडोरी तालुक्यातील तीन गावांना भेट देत कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. समिती केंद्र शासनाला अहवाल सादर करणार आहे. (Onion inspection coming to dum from central team nashik news)

यंदा जिल्ह्यात दिंडोरीमध्ये अधिक लागवड असल्याने पथकाने या तालुक्यांतील संभाव्य कांदा उत्पादनाचा आढावा घेतला असून तालुक्यात पाहणीवेळी तालुक्यातील कसबे वणी, चंडीकापूर, मांदाने येथील पाच शेतकऱ्यांच्या बांधावर जात केंद्रीय अधिकाऱ्यांनी माहिती घेतली. एकरी उत्पादन उत्पादन खर्च याचा आढावा घेतला. समिती जिल्ह्यातील संभाव्य कांदा उत्पादनाबाबत केंद्र शासनाला अहवाल देणार आहे.

यावेळी अव्वल सचिव केंद्रीय कृषी मंत्रालय मनोज के, कृषी उपसंचालक पंकज कुमार, ग्राहक कल्याण मंत्रालय सल्लागार पियुष डागर, राष्ट्रीय बागवणी बोर्डाचे सतीश कुमार, ए. के. सिंग, सोनाली बागडे, जिल्हा अधीक्षक विवेक सोनवणे, कळवण उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाळे, तालुका कृषी अधिकारी मीनल म्हस्के, दिंडोरी कृषी अधिकारी विजय पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

A team of the Center inspecting the onion crop at the farmer's dam in Vani Kasbe on Thursday.
Nashik Onion News : निफाड तालुक्यात उन्हाळ कांदा लागवडीची धूम

‘कांदा करणार भाजपचा वांदा’ची चर्चा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी मतदार संघात सर्वाधिक मतदार हे कांदा उत्पादक असून निर्यातबंदी निर्णयावर नाराज असल्याचे समाज माध्यमात होणाऱ्या पोस्ट वरून दिसत आहे. सरकारच्या विकास रथमध्ये ही बाब प्रकर्षाने जाणवली असून त्यात भाजप पक्ष कार्यालयातून येणाऱ्या सर्वेक्षण फोनला शेतकरी कांद्याची फोडणी देत सरकारच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त करत असल्याच्या रेकॉर्डिंग व्हायरल होत आहेत.

त्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटत असताना दिंडोरी मतदारसंघात कांदा भाजपचा वांदा करणार या चर्चेने सरकारने खडबडून जागे होत हे पथक तातडीने पाठवल्याची चर्चा गावोगाव रंगत आहे. निर्यातबंदी उठण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे.

A team of the Center inspecting the onion crop at the farmer's dam in Vani Kasbe on Thursday.
Nashik Onion News : कांदा पुन्हा गडगडला; बळीराजाची वाढली चिंता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com