Nashik Onion News : निफाड तालुक्यात उन्हाळ कांदा लागवडीची धूम

निफाड तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होत असून, उर्वरित क्षेत्रात गहू व मकाची लागवड होत आहे.
Onion cultivation in Navnath Patil Borgude's farm.
Onion cultivation in Navnath Patil Borgude's farm.esakal

Nashik Onion News : निफाड तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होत असून, उर्वरित क्षेत्रात गहू व मकाची लागवड होत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रांगड्या कांद्याची कमी लागवड केली असली, तरी रोपवाटिकेनुसार उन्हाळ कांद्याची लागवड सुरू आहे.

त्यामुळे कांदा रोपांची मोठ्या प्रमाणावर कमतरता निर्माण झाली आहे. कांदा उत्पादक शेतकरी तालुक्यासह बाहेरीलही मजूर आणून कांदा लागवड करीत आहेत.(Summer onion cultivation started in Niphad taluka nashik news)

निफाड तालुक्यात प्रामुख्याने द्राक्ष, कांदा, ऊस, मका व गहू ही नगदी पिके रब्बी हंगामात घेतली जातात. या सर्व पिकांच्या लागवड व काढणीचा हंगाम सुरू असून, त्यांच्या कामांना सर्वत्र गती मिळाली आहे. भांडवलाअभावी, तसेच पर्जन्यमान कमी झाल्याने बागायती पिकांची लागवड कमी झाली. गोदावरी नदी व कालव्याच्या दोन्हीही बाजूला पाण्याची उपलब्धता असल्याने अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी उन्हाळ कांदा व मका पिकाची लागवड करणे पसंत केले आहे.

उन्हाळ कांद्याचा उत्पादन खर्च सामान्य शेतकऱ्यांना न परवडणारा आहे. गेल्या वर्षीच्या उन्हाळ कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. कांद्याच्या भावाबाबत केंद्र व राज्य सरकार लक्ष देत नाही, ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आली आहे, म्हणून शेतकऱ्याला जादाचा आर्थिक फायदा करून देणारे पीक म्हणून मका पिकाकडे बघितले जात आहे.

शेतकऱ्याने शेतजमिनीची मशागत केली असली, तरी जमीन कांदा लागवड योग्य होण्यासाठी त्यावर रोटर फिरवावा लागतो. जमीन भुसभुशीत झाल्यानंतर वाफे तयार करण्यासाठी ट्रॅक्टर किंवा बैलांच्या यंत्रांचा उपयोग केला जातो. कांद्यासाठी तयार होणारी शेती येथेच थांबत नाही, तर त्यावर वाफे, माती लावून योग्य करण्यासाठी एकरी अडीच ते तीन हजार रुपये मजुरांना द्यावे लागतात.

Onion cultivation in Navnath Patil Borgude's farm.
Nashik Onion News: देवळ्यात कांद्याच्या क्षेत्रात 17 हजार हेक्टरने घट

दरवर्षी कांदा उत्पादक शेतकरी उसनवारी व दागदागिने बँकेत तारण ठेवून त्यावर पैसे मिळवून कांदा शेतीला भांडवल लावतात. हे सर्व करीत असताना कांदा काढणीनंतर कांद्याला भाव चांगला मिळाला, तर ठीक आहे. नाही तर शेतकऱ्यांच्या नशिबी पश्चात्तापच.

असे असले तरी शेतकऱ्यांना शेती केल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून अपेक्षांचे ओझे उराशी बाळगून उन्हाळ कांद्याची लागवड सुरू आहे. शेतकऱ्यांना कांदा लागवडीसाठी एकरी १० ते ११ हजार रुपये मजुरीचा खर्च द्यावा लागत आहे.

Onion cultivation in Navnath Patil Borgude's farm.
Nashik Onion News: दुष्काळी परिस्थितीतही ‘कसमादे’त गेल्यावर्षाएवढी कांदा लागवड; मजुरांना ‘अच्छे दिन’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com