नाशिक : महिला आरक्षण सोडतीचे ऑनलाइन प्रसारण

Womens Election reservation
Womens Election reservationesakal

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी (NMC Election) महिला आरक्षणासाठी (Women Reservation) मंगळवारी (ता. ३१) सोडत काढली जाणार आहे. महापालिकेच्या (NMC) कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात होणाऱ्या सोडतीच्या कार्यक्रमाचे सोशल मीडियावर ऑनलाइन प्रसारण होणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांना घरबसल्या सोडत पाहायला मिळणार आहे. (Online broadcast of womens reservation draw Nashik News)

महापालिकेच्या निवडणुकीची आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया सुरु झाली आहे. मंगळवारी महिला आरक्षणाची सोडत निघेल. त्यानंतर एक जूनला प्रारूप यादी प्रसिद्ध होईल. त्यावर येत्या ६ जूनपर्यंत हरकती मागविल्या जाणार आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता.२७) उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांच्यासह निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दादासाहेब गायकवाड सभागृहात जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. साधारण दोन वर्षाहून अधिक काळापासून बंद असलेल्या सभागृहाची यानिमित्ताने साफसफाई करण्यात आली. आरक्षण प्रक्रियेसाठी आसन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले. चिठ्ठी काढण्यासाठी शिक्षण विभागाकडून मुलांचे नियोजन होणार आहे.

Womens Election reservation
ब्लॅक स्पॉट बाबत शहरात सर्व्हेक्षण; शहर घाण करणाऱ्यांना बसणार चाप

आरक्षण सोडतीत साधारण ६७ महिलांच्या जागा असतील. शहरात ४४ प्रभाग असून प्रत्येक प्रभागात असेल त्यापैकी ४३ प्रभागात प्रत्येकी एक, एका प्रभागात दोन याप्रमाणे ४५ आरक्षण होतील, तर उर्वरित २२ जागांसाठी आरक्षणाच्या चिठ्ठीनुसार सोडतीच्या आधारे आरक्षण पडेल. या सगळ्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने इच्छुकांसह त्यांच्या कार्यकर्त्यांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेउन पोलिस यंत्रणेला पत्र देऊन बंदोबस्ताची मागणी केली आहे. आपतकालीन स्थितीतील तयारीचा भाग म्हणून अग्निशमन दल, वैद्यकीय पथकासह कर्मचाऱ्यांची सोय करण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी महापालिका ऑनलाइन प्रसारणासाठी संकेतस्थळ तयार करणार असून फेसबुकवर सोडतीच्या कामकाजाचे प्रसारण होणार आहे.

Womens Election reservation
रेल्वे स्टेशन मास्तरांचा ३१ मे ला संप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com