esakal | पुणे विद्यापीठाच्‍या जुलै-ऑगस्‍टमध्ये ऑनलाइन उन्हाळी परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

online exam

पुणे विद्यापीठाच्‍या जुलै-ऑगस्‍टमध्ये ऑनलाइन उन्हाळी परीक्षा

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उन्‍हाळी सत्र २०२१ च्‍या परीक्षेबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. त्‍यानुसार जुलै-ऑगस्‍टमध्ये ऑनलाइन परीक्षा होणार आहेत. परीक्षेबाबत सविस्‍तर मार्गदर्शक तत्त्वे व सूचना विद्यापीठाने बुधवारी (ता. १६) जारी केल्या. (Online-summer-exam-of-Pune-University-in-July-August-nashik-marathi-news)

जुलै-ऑगस्‍टमध्ये ऑनलाइन उन्हाळी परीक्षा

कोरोना महामारीमुळे विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्‍या निर्णयानुसार प्रथत ते अंतिम वर्ष पदविका, पदवी व पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांच्‍या परीक्षा जुलै-ऑगस्‍टमध्ये होतील. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्‍या द्वितीय सत्राच्‍या नियमित व अनुशेषित विद्यार्थ्यांच्‍या तसेच बहिःस्‍थ, श्रेणीसुधार परीक्षा जुलै, ऑगस्‍टमध्ये टप्प्‍याटप्प्‍याने होतील. या विद्यार्थ्यांच्‍या प्रात्‍यक्षिक, मौखिक, सेमिनार, प्रकल्‍प, शोधप्रबंध परीक्षा महाविद्यालय स्‍तरावर पूर्ण करायच्या आहेत. अंतर्गत गुण संगणक प्रणालीमार्फत विद्यापीठाकडे पाठवायचे आहेत. द्वितीय सत्राची माहिती उपलब्‍ध झाल्‍यावर गुण भरणे अनिवार्य राहील. एमई, एम.फार्म, एम. आर्किटेक्‍चर शिक्षणक्रमाच्‍या शोधप्रबंध परीक्षांचे मूल्‍यमापन महाविद्यालय स्‍तरावर होईल. यासाठी प्राचार्यांनी परीक्षकांची समिती गठीत करून विद्यार्थ्यांच्‍या कामाचे मूल्‍यमापन करून ३१ ऑगस्‍टपर्यंत विद्यापीठास गुण सादर करायचे आहेत.

...तर विद्यार्थ्यांना मिळेल संधी

ऑनलाइन परीक्षेची माहिती विद्यार्थ्यांना एसएमएस, ई-मेलद्वारे कळविली जाईल. यासाठी विद्यार्थ्यांचे नोंदणीकृत संपर्क क्रमांक कार्यान्‍वित असणे आवश्‍यक आहे. तांत्रिक कारणामुळे परीक्षेत खंड आल्‍यास तेवढाच कालावधी वाढवून दिला जाईल. जेथून खंड झाला, तेथून पुढील प्रश्‍न परीक्षेत विचारले जातील. नैसर्गिक आपत्ती, तांत्रिक अडचण अथवा कोरोना प्रादुर्भाव, तत्‍सम आजारांमुळे परीक्षेपासून मुकलेल्‍या विद्यार्थ्यांची खातरजमा केली जाईल, अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा घेतली जाईल.

हेही वाचा: अन् तरुणाने बांधल्या 'किन्नर'शी रेशीमगाठी! एका आगळ्यावेगळ्या लग्नाची चर्चा

परीक्षेसंदर्भात ठळक बाबी

-ऑनलाइन परीक्षा संगणक, लॅपटॉप, मोबाईलद्वारे देता येईल

-६० बहुपर्यायी प्रश्‍नांपैकी ५० ची अचूक उत्तरे ग्राह्य धरली जातील

-परीक्षेसाठी ६० मिनिटांचा कालावधी

-विज्ञान, तंत्रज्ञान शिक्षणक्रमातील गणित विषयासाठी ३० प्रश्‍न

-३० प्रश्‍नांपैकी २५ अचूक उत्तरे ग्राह्य, प्रत्‍येकी दोन गुण

-विज्ञान शाखेच्‍या अंतिम सत्र परीक्षेसाठी ७० टक्‍के अभ्यासक्रम

-उर्वरित सर्व शिक्षणक्रमांसाठी शंभर टक्‍के अभ्यासक्रमावर प्रश्‍न

-परीक्षा दिल्‍यानंतर ४८ तासांत गुणांची माहिती स्‍टुडंट प्रोफाइल सिस्टिमवर उपलब्‍ध

-दिव्‍यांग विद्यार्थ्यांसाठी अधिकचा वेळ व अन्‍य बाबी लागू राहतील

हेही वाचा: कोरोनामुळे लांबला नाशिक मेट्रोचा प्रवास!

loading image
go to top