esakal | २५ हजारांची लाच पडली महागात! ओतूरचा लाचखोर तलाठी ‘एसीबी’च्या जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

talathi

ओतूरचा लाचखोर तलाठी ‘एसीबी’च्या जाळ्यात

sakal_logo
By
रविंद्र पगार

कळवण (जि.नाशिक) : खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावून नोंद टाकण्यासाठी शेतकऱ्याकडून २५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या ओतूर येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई ‘एसीबी’ (ACB)च्या नाशिक युनिटने केली.

हेही वाचा: OBC चळवळीचा ‘आर्म' होणार ‘स्ट्राँग! राष्ट्रवादीला मिळेल बळ

२५ हजारांची लाच देण्याचे ठरले

तलाठी जयवंत कांबळे याच्याविरोधात कळवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावून नोंद टाकण्यासाठी ओतूर येथील तलाठी जयवंत कांबळे यांनी १८ ऑगस्टला तक्रारदाराकडे ३० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती २५ हजारांची लाच देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठी कांबळे यांना लाच घेताना अटक केली. याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ, पोलिस नाईक नितीन कराड, प्रभाकर गवळी, प्रवीण महाजन, शरद हेंबाडे यांनी केली.

हेही वाचा: चिकूच्या शेतीने आर्थिक पाठबळ! हरणगावच्या शेतकऱ्याचा प्रयोग

loading image
go to top