esakal | "कोरोनानंतरच्या आर्थिक संकटातही व्यापार, उद्योगासाठी संधी" - महसूलमंत्री 
sakal

बोलून बातमी शोधा

balasaheb-thorat.jpg

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍन्ड ऍग्रिकल्चरतर्फे झालेल्या राज्यस्तरीय ई-चर्चासत्रात श्री. थोरात यांनी उद्योगजगताला आश्‍वस्त करताना सरकार तुमच्याबरोबरच असल्याची ग्वाही दिली. तुमच्या सर्व अडचणी विविध विभागांशी संबंधित आहेत. मी सर्वांशी बोलून व लेखी कळवून तुमचे प्रश्‍न व अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा करेन. संपर्क कायम ठेवा. मी नेहमी तुमच्याबरोबर आहे, असे आश्‍वासनही त्यांनी या वेळी दिले

"कोरोनानंतरच्या आर्थिक संकटातही व्यापार, उद्योगासाठी संधी" - महसूलमंत्री 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर सर्वांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहणार आहे. त्यासाठी मार्ग काढणे, नियोजन करणे व त्या स्थितीत संधी शोधून त्यावर कसे काम करता येईल, याबाबत विचारविनमय सुरू आहे. संपूर्ण जगात व्यापार, उद्योग, शेती पूर्णत: बंद आहे. लॉकडाउन संपल्यावर निर्यातीसाठी आपल्याला अनेक संधी मिळतील. त्या शोधाव्या लागतील आणि त्याचा फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी (ता. 16) केले. 

"महाराष्ट्र चेंबर'च्या ई-चर्चासत्रात महसूलमंत्र्यांचे प्रतिपादन 
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍन्ड ऍग्रिकल्चरतर्फे झालेल्या राज्यस्तरीय ई-चर्चासत्रात श्री. थोरात यांनी उद्योगजगताला आश्‍वस्त करताना सरकार तुमच्याबरोबरच असल्याची ग्वाही दिली. तुमच्या सर्व अडचणी विविध विभागांशी संबंधित आहेत. मी सर्वांशी बोलून व लेखी कळवून तुमचे प्रश्‍न व अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा करेन. संपर्क कायम ठेवा. मी नेहमी तुमच्याबरोबर आहे, असे आश्‍वासनही त्यांनी या वेळी दिले. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा अध्यक्षस्थानी होते. राज्याच्या सर्व महसूल विभागांतील विभागीय चेंबर्स आणि त्यांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. श्री. मंडलेचा यांनी स्वागत करून सद्यःस्थितीचा आढावा घेतला. लघुत्तम, लघु व मध्यम उद्योग, तसेच व्यापारी व शेतकऱ्यांना जाणवत असलेल्या अडचणींकडेही त्यांनी लक्ष वेधले. लॉकडाउन संपल्यावर उद्योग सुरू करताना उद्योजकांना खेळत्या भांडवलाचा प्रश्‍न निर्माण होणार आहे.

VIDEO : जेव्हा विश्वास नांगरे पाटलांना आदेश मिळतो "तुम्ही बाहेर सीपी असाल, पण इथले 'एसीपी' आम्ही आहोत"!

राज्यभरातील 150 पेक्षा जास्त उद्योजक, व्यापारी चर्चेत सहभागी

जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी ट्रक जातात; परंतु ते जेव्हा रिकामे होऊन येतात, त्या वेळी त्यांना त्रास दिला जातो. याबाबत धोरण निश्‍चित करून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. सरकार, व्यापारी, उद्योजक, शेतकरी यांच्यात समन्वय असला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मंत्री थोरात यांच्यासह  मंडलेचा, विश्‍वस्त आशिष पेडणेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, रवींद्र मानगावे, शुभांगी तिरोडकर, नाशिक शाखेचे कार्याध्यक्ष संजय दादलीका, विदर्भ शाखेचे आशिष चंद्राना, कृषिमाल प्रक्रिया समितीच्या अध्यक्षा सुनीता फाल्गुने, सुधाकर देशमुख, देव भिसे, आनंद परांजपे, गणेश भाम्बे, ऋतुजा मोरे आदींनी चर्चेत भाग घेतला. राज्यभरातील 150 पेक्षा जास्त उद्योजक, व्यापारी चर्चेत सहभागी झाले होते.  

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित रूग्णाचा अंगावर थुंकण्याचा प्रकार..अँम्ब्युलन्स चालकाला मारहाण

loading image