Nashik News: श्रीराम विद्यालय संस्थेच्या चौकशीचे आदेश

 tarun eikya mandal shriram vidyalaya
tarun eikya mandal shriram vidyalayaesakal
Updated on

नाशिक : शहरातील तरुण ऐक्य मंडळ संचलित श्रीराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज या संस्थेतील संचालक मंडळाच्या कारभाराची चौकशी करून १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांनी माध्यमिक शिक्षण विभागाला दिले आहेत.

या संदर्भात चौकशीसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. (Order of inquiry into Sri Ram Vidyalaya Sanstha Nashik News)

संस्थेत केवळ २८ सभासद असून बहुतांश मयत आहे. मयत सदस्यांच्या वारसांना सदस्य करण्यासाठी संस्था अध्यक्ष, सचिव जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. याउलट त्यांनी आपल्या कुटुंबातील १० ते १२ सदस्यांना शाळेत बेकायदेशीररीत्या नियुक्त केले आहे.

अध्यक्ष, सचिवांना या माध्यमातून १० ते १२ लाख मिळतात, बेकायदेशीररीत्या देणग्या गोळा केल्या जातात, शाळेतील विद्यार्थ्यांकडून इतर साहित्यासाठी पैसे घेतात. या माध्यमातून एकाच कुटुंबातील व्यक्तीने संस्था ताब्यात घेतली आहे.

यासाठी संस्थेत गैरकारभार व भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शशिकांत कोठुळे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली होती. या तक्रारींची दखल घेत पालकमंत्री भुसे यांनी शिक्षण उपसंचालक यांना चौकशीचे आदेश दिले.

 tarun eikya mandal shriram vidyalaya
Yeola Marathi Sahitya Sammelan: येवल्यात शनिवारी, रविवारी पहिले मराठी साहित्य संमेलन

त्यानुसार शिक्षण उपसंचालक चव्हाण यांनी चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. उपशिक्षणाधिकारी देवरे यांच्या समितीला चौकशीचे आदेश देत चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, धर्मदाय आयुक्त यांच्याकडे केलेल्या तक्रारींवरून संस्थेची चौकशी सुरू झालेली आहे. त्यासाठी आयुक्तांनी संस्थेला पत्र देत त्यांच्याकडे विविध कागदपत्रांची मागणी केली आहे.

 tarun eikya mandal shriram vidyalaya
Mahacritikon 2023: महाक्रिटीकॉन 2023 परिषद उद्यापासून; राज्‍य स्तरावरून नऊशे डॉक्‍टर होणार सहभागी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com