Ayodhya Ram Mandir : झेंडे, पताकांनी शहर झाले श्रीराममय...! धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे विविध स्‍तरांवर आयोजन

अयोध्यानगरीत सोमवारी (ता.२२) होत असलेल्‍या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभर उत्‍साहाचे वातावरण बघायला मिळते आहे.
Ayodhya Ram Mandir : झेंडे, पताकांनी शहर झाले श्रीराममय...! धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे विविध स्‍तरांवर आयोजन

Ayodhya Ram Mandir : अयोध्यानगरीत सोमवारी (ता.२२) होत असलेल्‍या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभर उत्‍साहाचे वातावरण बघायला मिळते आहे. शहरासह उपनगरीय भागांमध्येही आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे.

भगवे झेंडे, पताकांसह कटआऊट, बॅनर उभारण्यात आले आहे. विविध संस्‍थांतर्फे धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्त केले आहे. (Organization of religious social programs at various levels in nashik news)

गेल्‍या काही दिवसांपासून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त वातावरण निर्मिती सुरु होती. नाशिककरांचा उत्‍साह शिगेला पोचला असून, कार्यक्रमाचे नियोजन सुरु होते. अगदी गृहनिर्माण प्रकल्‍पांच्‍या सोसायटीच्‍या स्‍तरापासून सार्वजनिक मंडळे, धार्मिक संस्‍था, सामाजिक संस्‍था यांच्‍यातर्फे कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

बच्चे कंपनीपासून ज्‍येष्ठ नागरिक सर्वांमध्ये उत्‍साह बघायला मिळतो आहे. श्रीराम मंदिरांसह इतर सर्व मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. त्‍याप्रमाणे कार्यक्रम आयोजित केलेल्‍या ठिकाणांवर कटआउट, बॅनर उभारत सोहळ्याची रंगत वाढविली जाते आहे.

Ayodhya Ram Mandir : झेंडे, पताकांनी शहर झाले श्रीराममय...! धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे विविध स्‍तरांवर आयोजन
Ayodhya Ram Mandir : प्रभू श्रीरामांनी बांधलेला रामसेतू कसा बुडाला?

शहरातील गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, महात्मा गांधी रोड, शालिमार, नेहरू चौक, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅन्ड, हिरावाडी रोड, छत्रपती संभाजीनगर रोड, दिंडोरी रोड, पेठरोडवर असे झेंडे मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले आहे.

झेंडे, टोपीला मागणी

अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्रतिमा छापील स्वरूपात असलेले भगवे झेंडे विक्रीसाठी उपलब्‍ध झाले होते. तसेच श्रीराम लिहिलेली गांधी टोपी विक्रीसाठी उपलब्‍ध केली होती. यासोबत पातळ असे उपरण्यालाही चांगली मागणी मिळते आहे. अनेक ठिकाणी मंदिराची प्रतिकृतींची मांडणी केलेली बघायला मिळाली.

मंदिरेही सजली

विविध देवस्थानांवर भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. देवस्थानतर्फे मंदिरासह परिसराची स्वच्छता करण्यात आली असून रामलल्लांचे मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात येत आहे. याशिवाय घरांवरही मोठ्या संख्येने भगवे ध्वज लावण्यात आले आहेत.

Ayodhya Ram Mandir : झेंडे, पताकांनी शहर झाले श्रीराममय...! धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे विविध स्‍तरांवर आयोजन
Ayodhya Ram Mandir : प्रभू श्रीरामांनी बांधलेला रामसेतू कसा बुडाला?

उत्‍सवाची क्षणचित्रे अशी-

रस्‍त्‍यांच्‍या दुभाजकांवर फडकताय भगवे झेंडे

सर्व प्रमुख चौकांत उभारले स्‍वागताचे फलक

कॉलनी, गृहप्रकल्‍पांमध्ये रांगोळी, सजावटीवर भर

एकत्रित येत भजन, कीर्तनाने दिवस साजरा करण्याचे नियोजन

महाप्रसाद, संगीतमय कार्यक्रमांचेही आयोजन

धार्मिक सोहळ्यांसाठी मोफत लॉन्‍स, कार्यालयांची उपलब्‍धता

सार्वजनिक सुट्टी जाहीर झाल्‍याने आनंद द्विगुणित

Ayodhya Ram Mandir : झेंडे, पताकांनी शहर झाले श्रीराममय...! धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे विविध स्‍तरांवर आयोजन
Ayodhya Ram Mandir : लोकसहभाग आणि नियोजनबद्ध प्रयत्नांतून मंदिर! स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांची मुलाखत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com