नाशिक : रोजगार मेळाव्‍याचे २३ मे पासून आयोजन | latest nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

employment fair

नाशिक : रोजगार मेळाव्‍याचे २३ मे पासून आयोजन

नाशिक : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत २३ ते २६ मे दरम्‍यान ऑनलाइन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित केला आहे. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्यासाठी मेळावा होत असून, मुलाखती मोबाईल दूरध्वनी, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतली जाणार आहे.

जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांमध्ये आवश्यक मनुष्यबळाचा सहभाग आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याचे जाणवत आहे. यामुळे या रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभाग नोंदविण्यासाठी व नियोक्ते आणि नोकरी इच्छुक उमेदवार यांना एकत्रित सुविधा उपलब्ध होण्यासाठी महास्वयंम वेबपोर्टलवरून हा मेळावा होईल.

हेही वाचा: ‘डिजिटल मार्केटिंग’मध्ये रोजगाराच्या असंख्य संधी

नियोक्त्यांकडून रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाइन अधिसूचित करण्यात येणार आहेत. यासाठी वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या ऑनलाइन अॅप्लाय केलेल्या उमेदवारांच्या नियोक्त्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे ऑनलाइन मुलाखती घेतली जाईल. या संधीचा बेरोजगार उमेदवारांनी लाभ घेण्यासाठी वेब पोर्टलवर लॉगइन करावे, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा: करिअर अपडेट : कृषी पर्यटन : संस्कृतीला रोजगाराची जोड

Web Title: Organizing Employment Fair From 23rd May Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top