नाशिक : डेंगी-चिकूनगुनिया; 5 वर्षातील उच्चांकी रुग्णसंख्या

नाशिककरांनो आरोग्य सांभाळा : डेंगी, चिकूनगुनियाची 5 वर्षांतील उच्चांकी रुग्णसंख्या
dengue
dengueesakal

नाशिक : शहरात चिकूनगुनिया व डेंगीचा (dengue and chikungunya) उद्रेक कायम असून, जनजागृतीसह विविध उपाययोजना कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (corona third wave) सामना करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू असताना डेंगी व चिकूनगुनिया आजाराने तोंड वर काढले आहे.

पाच वर्षातील सर्वोत्तम आकडेवारी

मागील चौदा दिवसांमध्ये चिकूनगुनियाचे ९५, तर डेंगीचे १४० रुग्ण आढळले. पाच वर्षांतील उच्चांकी या आजारांच्या रुग्णांची संख्या बनली आहे. साडेआठ महिन्यात चिकूनगुणियाचे ७३७, तर डेंगीचे ७१७ रुग्ण आढळले. महापालिकेकडे प्राप्त होणाऱ्या आकडेवारीपेक्षा खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंगी व चिकूनगुनियाचे रुग्ण उपचार घेत आहेत. डेंगीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने जनजागृती मोहीम हाती घेतली, परंतु त्याचा उपयोग होताना दिसत नाही. शहरात औषधांची फवारणी होत नसल्याची बाब समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यात शहरात ३११ नागरिकांना डेंगीचा बाधा झाली होती, तर चिकूनगुनियाचे २१० रुग्ण आढळले होते. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात १४० डेंगीचे रुग्ण आढळले. चिकूनगुनियाचे ९५ रुग्ण आढळले. मागील पाच वर्षात सर्वाधिक डेंगी व चिकूनगुनियाचे रुग्ण आढळले आहेत. १ जानेवारी ते १४ सप्टेंबर या कालावधीत ७१७ डेंगीचे तर ५३७ चिकूनगुनियाचे रुग्ण आढळले.

dengue
मनसेची एकी कागदावर की प्रत्यक्षात? राज ठाकरे दौऱ्यावर चर्चा

पाच वर्षांतील रुग्णसंख्या (जानेवारी ते सप्टेंबर)

वर्ष डेंगी चिकूनगुनिया

सन २०१७ १५१ ४

सन २०१८ ३६८ ४०

सन २०१९ १७७ १

सन २०२० ११५ ७

सन २०२१ ७१७ ५३७

dengue
नाशिकच्या 'या' तालुक्यांना आणखी पावसाची गरज; जलसाठा कमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com