esakal | देवरूपी माणूस! स्वखर्चाने गरजूंना 'प्राणवायू' देऊन जीवनदान

बोलून बातमी शोधा

oxygen for needy people
देवरूपी माणूस! स्वखर्चाने गरजूंना घरपोच 'प्राणवायू' देऊन जीवनदान
sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : स्वखर्चाने ऑक्सिजन सिलिंडर देऊन गरजू रुग्णांचे प्राण वाचण्याचे काम येथील सामाजिक कार्यकर्ते किरण राजवाडे करीत आहेत. त्यांच्या कार्याबाबत रुग्णाच्या नातेवाइकांनी समाधान व्यक्त केले आहे.

स्वखर्चाने गरजूंना 'प्राणवायू' देऊन जीवनदान

सिडकोतील सामाजिक कार्यकर्ते किरण राजवाडे हे शक्य असेल त्या परिस्थितीमध्ये ऑक्सिजन सिलिंडर देण्याचे कार्य करीत आहे. नुकतेच राजवाडे यांचे मित्र राज मोरे यांचे मोठे भाऊ अमित मोरे यांना किरण राजवाडे यांनी प्राणवायू देऊन जीवनदान दिले. सावतानगर येथील अमित यांना दोन दिवसापासून ऑक्सिजन सिलिंडर मिळत नव्हते. किरण राजवाडे यांनी ऑक्सिजन सिलिंडर स्वतः भरून देत उपलब्ध करून दिले. राजवाडे यांच्या सहकार्याबद्दल मोरे कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले.

हेही वाचा: रुग्ण अन् नातेवाइकांचा तो टाहो.. घटनेची आठवण होताच अजूनही चुकतो काळजाचा ठोका..

ऑक्सिजन बेड मिळत नव्हता. सामाजिक कार्यकर्ते किरण राजवाडे यांना संपर्क साधला, त्यांनी तत्काळ ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध केले. यामुळे भावाचे प्राण वाचले.- राज मोरे, रुग्णाचे बंधू

हेही वाचा: गॅंगस्टर रवी पुजारीला न्यायालयीन कोठडी; आर्थर रोड जेलला होणार रवानगी

काही दिवसांपासून ज्यांना आवश्यकता भासेल अशा रुग्णांना घरपोच ऑक्सिजन सिलिंडर देण्याचे काम करत आहे. तात्पुरत्या स्वरूपात का होईना अशा रुग्णांना मदत होत आहे.- किरण राजवाडे, सामाजिक कार्यकर्ते, सिडको