esakal | मालेगावात तीन आठवड्यात ऑक्सिजन प्लॅँट; महापालिकेचे नियोजन सुरू

बोलून बातमी शोधा

Oxygen Plant
मालेगावात तीन आठवड्यात ऑक्सिजन प्लँट; महापालिकेचे नियोजन सुरू
sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शहर व परिसरातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये सातत्याने ऑक्सिजन तुटवडा भासत असून, लोकप्रतिनिधी व प्रशासनाला रोज कसरत करावी लागत आहे. महापालिका प्रशासनाला यापूर्वी ऑक्सिजन पुरवठा करणारे ठेकेदार इंदूर गॅस एजन्सीचे संचालक भरत मेहता यांना सायने शिवारात सुमारे ९० लाखांच्या ऑक्सिजन प्लँटसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.

आगामी तीन आठवड्यात हा प्लँट सुरू होईल. त्याच वेळी महापालिकेला हवेतील ऑक्सिजन (एअर ऑक्सिजन) प्लँट उभारता येईल का, यादृष्टीने नियोजन व अभ्यास सुरू आहे. महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी, उपायुक्त नितीन कापडणीस यांनी ‘सकाळ’ला माहिती दिली.

कापडणीस म्हणाले, की मेहता यांचा प्लँट सुमारे ९० लाख रुपये खर्चाचा आहे. तातडीची गरज म्हणून महापालिकेने त्यांना सायने शिवारात जागा उपलब्ध करून दिली. त्याचे काम प्रगतिपथावर आहे. हा प्रकल्प सुरू होण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागेल. त्यासाठी लिक्विड ऑक्सिजनची गरज भासणार आहे. सध्या लिक्विड ऑक्सिजनचाही तुटवडा आहे. संबंधित पुरवठादाराचे लिक्विड ऑक्सिजन पुरविणाऱ्या कंपनीशी बोलणे सुरू आहे. यासाठी कच्चा माल लागणार आहे. या प्लॅँटमधून ८०० ते १००० ऑक्सिजन सिलिंडर दररोज मिळू शकतील.

हेही वाचा: शत्रूवरदेखील असा प्रसंग येऊ नये! तेजस्विनीच्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलं

हवेतून ऑक्सिजन प्लँटचाही विचार

महापालिका शाश्‍वत व कायमस्वरूपी म्हणून एअर ऑक्सिजन प्लँटचा विचार करीत आहे. राज्य शासनानेही यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली असून, काही मार्गदर्शक सूचना पाठविल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रात भुसावळ, नंदुरबार व जळगाव येथे असा प्रयोग सुरू झाला आहे. या प्लँटमधून कमी प्रमाणात ऑक्सिजन मिळत असले तरी ते कायमस्वरूपी असेल. याबाबत विविध प्रकल्पांचा अभ्यास, माहिती, नियोजन, प्रकल्प अहवाल यासह अन्य बाबींवर नियोजन सुरू आहे. एअर ऑक्सिजन प्लँटसाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

हेही वाचा: क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं! मुलाचं शेवटचं तोंडही पाहू शकली नाही आई