esakal | जिल्ह्यातील नऊ रुग्णालयांत डीपीडीसीतून ऑक्सिजन प्लांट; दहा कोटींची मान्यता

बोलून बातमी शोधा

oxygen
जिल्ह्यातील नऊ रुग्णालयांत डीपीडीसीतून ऑक्सिजन प्लांट; दहा कोटींची मान्यता
sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांत कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था व्हावी, यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून पहिल्या टप्प्यात नऊ रुग्णालयांमधील ऑक्सिजन जनरेशन प्लांटला मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून दहा कोटी ८८ लाखांच्या प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : पोलिस बंदोबस्तात कर्मचाऱ्यांचे जाब-जबाब

दहा कोटी ८८ लाखांच्या प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शासकीय रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या होत्या. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन बेड्सची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र सद्या लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. त्या मुळे यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यातील चार उपजिल्हा रुग्णालय व चार ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती करण्यात यावी, असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात दहा रुग्णालयांत ऑक्सिजन या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

हेही वाचा: असे घडले मृत्यूतांडव! नाशिक ऑक्सिजन गळतीची घटना cctv मध्ये कैद; पाहा VIDEO