अखेर कारखान्यांचा ऑक्सिजन बंद! वैद्यकीय कारणासाठीच होणार पुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen supply to factories in the city shut down nashik marathi news

जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांना औद्योगिक कारणासाठी केला जाणारा पुरवठा बंद करून फक्त वैद्यकीय कारणासाठीच ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आदेश शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत दिल्याने पुढील आठ दिवसांत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन कंपन्यांनी दिले आहे. 

अखेर कारखान्यांचा ऑक्सिजन बंद! वैद्यकीय कारणासाठीच होणार पुरवठा

नाशिक : जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांना औद्योगिक कारणासाठी केला जाणारा पुरवठा बंद करून फक्त वैद्यकीय कारणासाठीच ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आदेश शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत दिल्याने पुढील आठ दिवसांत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन कंपन्यांनी दिले आहे. 

शहर व ग्रामीण भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत असल्याची नवी समस्या निर्माण झाली आहे. शहरात सध्या दररोज चार ते पाच किलोलिटर ऑक्सिजनचा पुरवठा होतो. येत्या काळात अठरा ते वीस किलोलिटर ऑक्सिजनची आवश्‍यकता भासणार आहे. परंतु सिलिंडरपासून ते रिफलिंग व ऑक्सिजन लिक्विड वाहतूक करणाऱ्या टँकरचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

तर कारवाई होणार

ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांनीदेखील मागणीनुसार पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविली होती. तांत्रिक कारणे, टँकर उपलब्ध नसणे आदी कारणांमुळे ऑक्सिजन पुरवठा करण्यात अडचण येत होती. त्यामुळे औद्योगिक वसाहतीला लागणारा रोजचा ऑक्सिजन पुरवठा बंद करून त्याऐवजी रुग्णालयांसाठीच पुरवठा करण्याची मागणी पुढे येत होती. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठादार व अधिकाऱ्यांमध्ये बैठक होऊन त्यात औद्योगिक वसाहतीत म्हणजे कारखान्यांना होणारा ऑक्सिजन पुरवठा बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उत्पादकांनी फक्त रुग्णालयांसाठीच ऑक्सिजनची निर्मिती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या व्यतिरिक्त औद्योगिक वसाहतीत ऑक्सिजन पुरवठा झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईचे आदेश नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे यांनी दिले. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

मुंबई, रायगड येथून पुरवठा 

महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी तिप्पट ऑक्सिजन पुरवठा करण्याची तयारी केली असून, रायगड, मुंबई येथून अतिरिक्त ऑक्सिजन मागविण्यात आला आहे. नाशिक रोड येथील नवीन बिटको रुग्णालयात वीस, तर डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दहा किलोलिटर क्षमतेची ऑक्सिजनची टाकी बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या चार किलोलिटर दररोज ऑक्सिजन पुरवठा केला जात असून, रुग्णसंख्या दुप्पट होण्याची शक्यता लक्षात घेऊन बारा किलोलिटर अतिरिक्त ऑक्सिजन साठा उपलब्ध होणार असल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी केला. मविप्र रुग्णालयात प्रत्येकी तीन किलोलिटरच्या दोन क्षमतेच्या टाक्या बसविल्या जाणार असून, या टाक्या दाखल झाल्या आहेत. तर यापुढे महापालिकेचे अधिकारी खासगी रुग्णालयांमध्ये होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात माहिती संकलित करणार आहेत.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

संपादन - रोहित कणसे

Web Title: Oxygen Supply Factories City Shut Down Nashik Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashik