Nashik Crime News : Oxytocinची अवैध विक्री; 1 हजार बॉटल जप्त | Oxytocin illegal sale 1 thousand bottles seized nashik crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

illegal sale of oxytoxin bottle

Nashik Crime News : Oxytocinची अवैध विक्री; 1 हजार बॉटल जप्त

Nashik Crime News : शहरातील हिरापुरा भागातील हायफाय हॉटेलच्या पुढे मोकळ्या मैदानावरील पञ्याच्या खोलीत किल्ला पोलिसांनी छापा टाकून अवैधरित्या ऑक्सीटोसीनची विक्री करणाऱ्या मोहम्मद अन्वर मोहम्मद इकबाल (वय ५१, रा. मोतीपुरा, शनिवार वार्ड) याला अटक केली. (Oxytocin illegal sale 1 thousand bottles seized nashik crime )

पोलिसांनी त्याच्या ताब्यातून शंभर मिलीलीटर मापाच्या एक हजार बॉटल सुमारे साठ हजार रुपये किंमतीचे पाच बॉक्स जप्त केले. मंगळवारी (ता.३०) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

शहरात ऑक्सीटोसीनच्या बॉटल हे हार्मोन प्रसुती सुरळीत करण्यासाठी असताना त्याचा गाई-म्हशीचे दुध पाणवण्यासाठी अवैधरित्या विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, उपअधिक्षक प्रदीपकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गौतम तायडे, उपनिरीक्षक एन. पी. महाजन, पोलिस नाईक सय्यद, सचिन भामरे, पंकज भोये, निलेश निकाळे आदींनी हिरापुरा भागात छापा टाकून ही कारवाई केली. यावेळी मोहम्मद अन्वर हा औषध व सौंदर्य प्रसाधनाचा कुठलाही परवाना नसताना विना परवाना ऑक्सीटोसीन विक्रीसाठी बाळगून असल्याचे मिळून आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गायी, म्हशी व दुभते पशुधन पाणवण्यासाठी अवैधरित्या ऑक्सीटोसीनची विक्री झाल्याने हे दुध आरोग्यास हानीकारक असते. अशा दुधामुळे श्रवण कमजोरी, दृष्टीहिनता, पोटाचे आजार, नवजात बाळाची कावीळ, गरोदर स्त्रियांना रक्तस्त्राव, अनैसर्गिक गर्भपात, श्‍वसन व त्वचेचे आजार तसेच अन्य गंभीर आजार होण्याची शक्यता असताना रजिस्टर न ठेवता प्रिस्क्रीप्शन आवश्‍यक असताना त्याची बेकायदा विक्री होत असल्याचे आढळून आले.

या इंजेक्शनमुळे पशुधनाला क्रुरतेची वागणूक देतानाच प्राण्यांवर अत्याचार होत असल्याचे अन्न औषध निरीक्षक प्रशांत ब्राह्मणकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. श्री. ब्राह्मणकर यांच्या तक्रारीवरुन मोहम्मद अन्वरविरुध्द किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान गेल्या वर्षी आझादनगर पोलिसांनी महामार्गावरील म्हाळदे शिवारात याच पध्दतीने अवैधरित्या विक्री होणारा ऑक्सीटोसीनचा मोठा साठा जप्त केला होता. त्यावरुन शहरात सर्रासपणे अवैधरित्या ऑक्सीटोसीन विक्री होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

टॅग्स :Nashikcrime