Nashik News: खळबळजनक! चांदवड टोल नाक्यावर स्वांतत्र्य दिनी 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा

statement given
statement givenesakal

Nashik News : देशभरात काल स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना चांदवड मध्ये एका व्यक्तीने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवड येथील मंगरूळ टोलनाक्यावरील एका कर्मचाऱ्याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याची घटना घडली आहे. (Pakistan Zindabad slogans given by toll employee at Chandwad toll booth on Independence Day Nashik News)

याप्रकरणी पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चांदवड टोल नाक्यावर स्वांतत्र्य दिनाच्या कार्यक्रम सुरू असतानाच याच टोलनाक्यावर टी सी पदावर कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या.

यानंतर हि घटना पोलिसांना समजताच जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनिकेत भारती पोलीस उप अधीक्षक सोहेल शेख यांनी तात्काळ दखल घेऊन चांदवड ला भेट घेतली व परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तो चांदवड येथील टोल नाक्यावर गेल्या पाच ते सहा वर्षांपासून टी.सी. या पदावर कार्यरत आहे. काल मंगळवार (दि.१५) रोजी त्याने काही नागरिक व टोल कर्मचाऱ्यांसमोर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. टोलनाका व्यवस्थापनाने या कर्मचाऱ्यास निलंबित देखील केले आहे.

दरम्यान, याप्रकरणाची नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप (Shahaji Umap) यांनी स्वतः लक्ष घालून गंभीर दखल घेतली असून तपासाला गती दिली आहे. या व्यक्तीचा हि घोषणा देण्याचा काय उद्देश होता. या पाठीमागे अजून कोणी आहे का यासह अनेक बाबींचा पोलीस तपास करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

statement given
Pune Crime : मंगला चित्रपटगृहाजवळील खून टोळीयुद्धातून? दोघेजण ताब्यात

पुढील तपास चांदवडच्या प्रभारी पोलिस निरीक्षक सविता गर्जे व पोलीस अंमलदार धुमाळ हे करत असून संशयितावर काय कार्यवाही केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान या घटनेचे पडसाद चांदवड शहरात तात्काळ उमटले.

या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सर्वपक्षीय शेकडो कार्यकर्त्यांनी विश्रामगृहाच्या आवारात जमून तेथून पोलिस स्टेशनपर्यंत भारत माता की जय, वंदे मातरम् च्या घोषणा देत मोर्चा काढला.यानंतर संबंधित व्यक्तीला कठोर कारवाई करून त्याच्यावर देवद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

आमच्या चांदवड शहरात आम्ही सर्वधर्मीय जनता विशेषतः हिंदू मुस्लिम अत्यंत गुण्यागोविंदाने राहतो आमचे चांदवड शहर हे शांतताप्रिय शहर आहे. आमच्यात कोणतीही तेढ नाही. याठिकाणी या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाज देखील उपस्थित आहे.

त्यामुळे पोलिसांनी लावलेले कलम न लावता थेट त्याच्यावर देवद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी एकमुखी मागणी जमावाने केली. यावेळी कॉंग्रेस चे तालुकाध्यक्ष संजय जाधव, भाजपचे आत्माराम कुंभार्डे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास भुजाडे, माजी नगराध्यक्ष भुषण कासलीवाल, निवृत्ती घुले, दत्तात्रय गांगुर्डे, भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, आमदार डॉ राहुल आहेर यांचे स्विय सहाय्यक सागर आहिरे, पंकज निकम, रामेश्वर भावसार, तुषार झारोळे, अमोल बिरारी, संतोष बडादे, पंकज गोसावी आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

statement given
Crime News: धक्कादायक! पुण्यातील मंगला टॉकीजबाहेर तरूणाचा निर्घृण खून; चित्रपट पाहून बाहेर येताच कोयते, तलवार, दगडाने ठेचले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com