Nashik Municipal Election : तीन वर्षांनंतर नाशिक जिल्ह्यातील ११ पालिकांच्या निवडणुका; महायुती-महाआघाडीचे काय होणार?

Election Schedule and Code of Conduct Implemented Across 11 Councils : नाशिक जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल, महायुती आणि महाआघाडीतील चुरस वाढली.
 Election

Election

sakal 

Updated on

नाशिक: जिल्ह्यातील ११ पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. या सर्व पालिकांमधील एकूण सदस्यांच्या २६६ व थेट नगराध्यक्षपदाच्या ११ जागांसाठी २ डिसेंबरला मतदान घेण्यात येणार असून, ३ डिसेंबरला निकाल हाती येतील. या सर्व ठिकाणी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तब्बल तीन वर्षांनंतर होणाऱ्या पालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुती व महाआघाडी होणार की सर्व पक्ष स्वतंत्र निवडणुकांच्या आखाड्यात उतरणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com