Panchavati Express
sakal
नाशिक रोड: नाशिककरांची ‘जीववाहिनी’ समजल्या जाणाऱ्या आणि गेल्या ५० वर्षांत लाखो नाशिककरांना रोजगार-व्यवसाय देणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसचा ५० वा वाढदिवस शुक्रवारी (ता. ३१) उत्साहात साजरा करण्यात आला. नाशिक रोड रेल्वेस्थानकात सकाळी सातला गाडी येताच, केक कापून आणि पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. ‘पंचवटी’ येताच ढोल-ताशांच्या गजरात, गाडीला फुगे आणि फुलांची तोरणे लावून तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.