Panchavati Express
sakal
नाशिक रोड: रेल्वेला घसघशीत महसूल देणाऱ्या, नाशिककरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या व प्रतिष्ठेच्या असलेल्या मनमाड-नाशिक-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसला काही दिवसांपासून विविध समस्यांनी ग्रासले आहे. याचा विपरीत परिणाम प्रवाशांवर होत आहे. विशेषकरून पासधारक प्रशासनाच्या या मनमानी व अनागोंदी कारभाराचे बळी ठरत आहे.