esakal | पंचवटी पोलिसांकडून दोन दिवसांत २२९ जणांवर कारवाई

बोलून बातमी शोधा

Crime
पंचवटी पोलिसांकडून दोन दिवसांत २२९ जणांवर कारवाई
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

म्हसरूळ (नाशिक) : पंचवटी पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली असून, दोन दिवसांत २२९ जणांवर कारवाई करीत सुमारे एक लाख अठरा हजार रुपयांची दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.

पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांनी प्रामुख्याने गर्दीच्या ठिकाणी लक्ष केंद्रित केले आहे. यात नाशिक बाजार समिती आणि फुलेनगर भाजी बाजार परिसरात सातत्याने कारवाईचा धडाका लावला आहे. सोमवार (ता. १९) व मंगळवार (ता. २०) विनामास्क फिरणारे, सामाजिक अंतर न पाळणे, विनाकारण रस्त्यावर भटकणे, मार्केटमध्ये विनापास फिरणे अशा सुमारे २२९ नागरिकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून एक लाख अठरा हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

हेही वाचा: रेमडेसिव्हिरची खुल्या बाजारात विक्री; सुधाकर बडगुजर यांचा आरोप

पंचवटी परिसरातील गोदाघाट, मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजा, दिंडोरी नाका, नाशिक बाजार समिती, पेठ रोड, मखमलाबाद नाका आदी परिसरात अनावश्यक फिरणाऱ्या सुमारे ३५ नागरिकांची विभागीय कार्यालयातील मनपा कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कोरोना ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली. यात सात नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले असून, त्यांना दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतमधील कोविड सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

हेही वाचा: दहा दिवसांसाठी बांधकामे बंद; बिल्डर्स असोसिएशनचा निर्णय

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. अत्यावश्यक कामाशिवाय कोणाही घराबाहेर पडू नये. येत्या ३० एप्रिलपर्यंत मोकाट फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व कोरोना चाचणी सुरूच ठेवली जाणार आहे.

- अशोक भगत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पंचवटी