नाशिक- जिल्ह्यातील बिगरपेसा क्षेत्राबाहेरील ८०९ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदांच्या आरक्षणात कोणताही बदल नसल्याने ते अंतिम करण्यात आले आहे. आरक्षित जागांमधील ५० टक्के पदे ही महिलांसाठी राखीव असतील. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये बहुतांक्ष गावांमध्ये राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत.