Panchkalyanak Mahotsav
sakal
प्रशांत भरवीरकर- नाशिक: पंचकल्याणक महोत्सवाच्या पावन आणि ऐतिहासिक पर्वाची भव्यता अधिकच उजळवणारा, श्रद्धा, तपस्या आणि उत्कृष्ट शिल्पकलेचा संगम असलेला अत्यंत देखणा व भव्य रथ मिरवणुकीसाठी पूर्णत्वाला आला आहे. जैन धर्मपरंपरेतील धार्मिक मूल्ये, अहिंसा, संयम आणि शुद्धतेचे प्रतीक असलेला हा रथ पाहणाऱ्यांच्या मनात भक्तिभाव जागवणारा ठरणार आहे.