Unseasonal Rain Crop Damage : सिन्नर तालुक्यात नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरु

Crop damage caused by unseasonal rain in Sinnar taluk on Sunday evening
Crop damage caused by unseasonal rain in Sinnar taluk on Sunday eveningesakal

Unseasonal Rain Crop Damage : सिन्नर तालुक्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीच्या टप्प्यात आलेल्या पिकांना पावसाने झोडपल्याने शेतकर्?यांच्या हातचा घास हिरावला गेला आहे.

त्यामुळे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतिपकांचे ग्रामस्तरीय समितीतर्फे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार एकनाथ बंगाळे यांनी दिले आहेत. (Panchnama of Unseasonal Rain Crop Damage in Sinnar taluka started nashik news)

तहसीलदार बंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या त्रिस्तरीय ग्रामस्तरीय समितीस पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

कृषी विभागाच्या पाहणीत प्राथमिक टप्प्यात तालुक्यातील 20 गावांमधील सुमारे हेक्टरहून अधिक क्षेत्र अतिवृष्टीने बाधित झाले आहे. या व्यतिरिक्तही ज्या गावांमध्ये शेतकर्‍यांचे नुकसान झाले असेल तेथील ग्रामस्तरीय समितीने नुकसानीचे पंचनामे करून एकित्रत अहवाल शासनास सादर करण्याचे सूचित करण्यात आले आहे.

नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पालक अधिकारीयांची ग्रामस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेशी संबंधित अभिलेख तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत विमा कंपनीकडे पाठवण्यात येतील.

तर विमा न काढलेल्या मात्र 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे व गोषवारा तलाठ्यांमार्फत तहसील कार्यालयात सादर करण्यात येणार आहे. कामात हलगर्जी करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

निवासी नायब तहसीलदार सागर मुंदडा, सहाय्यक गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते, कृषी अधिकारी महेश वेठेकर यांची पर्यवेक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . या बोरखिंड, सरदवाडी, पांढूर्ली, मोह, पाटोळे, नायगाव , पास्ते, कणकोरी, आगासखिंड, जायगाव,माळेगाव ब्राह्मणवाडे ,मोहदरी ,बेलू ,चिंचोली, सोनगिरी, चंद्रपूर, वडझिरे , पिंपळे आटकवडे, आदी गावांमध्ये नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Crop damage caused by unseasonal rain in Sinnar taluk on Sunday evening
Nashik Unseasonal Rain : अवकाळीचा पावणेसहा हजार हेक्टरवर फटका

याव्यतिरिक्तही ज्या गावांतील शेतकरी यांचे नुकसान झाले आहे, तेथेही पंचनामे करण्यात येणार आहे.नुकसानीचे पंचनामे करताना शेतजमीन व पिकांचे सर्वे नंबर / गट नंबर दाखवणे, सातबारामध्ये नोंद नमूद केलेल्या क्षेत्राप्रमाणे आपदग्रस्त क्षेत्र जुळविण्याची जबाबदारी तलाठ्यांवर असणार आहे.

तर नुकसान झालेल्या पिकांचे जीपीएस फोटो मोबाइलवर काढून ते शासकीय संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम ग्रामसेवकास करावे लागणार आहे. नुकसानीची टक्केवारी ठरवण्याची जबाबदारी कृषी सहाय्यकांवर सोपवण्यात आली आहे.

पालक अधिकारी यांनी इतर ग्रामस्तर अधिकान्यांशी समन्वय साधुन पंचनाम्याची कार्यवाही दि.15/04/2023 मुदतीत पुर्ण करावी, प्रधानमंत्री पिक विमा योजनेसंबंधी अभिलेख तालुका कृषी अधिकारी कार्यालायामार्फत विमा कंपनी प्रतिनीधी श्री. वाजे यांना सुपूर्त करावे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी नसलेल्या व 33% पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतक-यांचे पंचनामे व गोषवारा पालक अधिकारी यांनी तलाठी यांचेमार्फत तहसिल कार्यालयात सादर करावा.

दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी झालेल्या अवकाळी पावसा ने झालेल्या नुकसानाची आकडेवारी अंदाजे आहेत

गावे 20

गहू 12

कांदा 270

आंबा 4

टोमॅटो 50

भाजीपाला 30

एकूण 366 हेक्टर

अंदाजे शेतकरी 600

Crop damage caused by unseasonal rain in Sinnar taluk on Sunday evening
Nashik Unseasonal Rain : इगतपुरीच्या पूर्व भागात गारपिटीचे पुन्हा थैमान; शेतकरी उध्वस्त..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com