leopard
sakal
पांढुर्ली: पांढुर्ली व पंचक्रोशीत रात्री बिबट्यांचा वावर असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महावितरण कंपनीने शेती पंपासाठी वीजपुरवठा दिवसा करण्यात आला आहे. अशी माहिती पांढुर्ली उपकेंद्राचे सहायक अभियंता कार्यकारी दीपक मोगल यांनी दिली. पांढुर्ली येथे वीज वितरण कंपनीचे ग्रामीणचे कार्यकारी अभियंता अनिल झटकरे, उपकार्यकारी अभियंता हेमंत बनसोड यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत शेतीविषयक वीजपुरवठा दिवसा देण्यासंबंधी नियोजन केलेले आहे.