esakal | गोदावरी नदीपात्रावर पाणवेलींचे साम्राज्य; स्वच्छते अभावी पाण्यावर तवंग

बोलून बातमी शोधा

dirt in the Godavari river
गोदावरी नदीपात्रावर पाणवेलींचे साम्राज्य; स्वच्छते अभावी पाण्यावर तवंग
sakal_logo
By
दत्ता जाधव

नाशिक : अहिल्यादेवी होळकर पुलाच्या वरील बाजूला वाहून आलेला गाळ व वाळूमुळे उथळ झालेले पात्र खोल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र यामुळे पुलाच्या खालील बाजूस वाहून आलेला गाळ व पाणवेली मिश्रित पाण्यामुळे रामकुंडाखालील (Ramkund) सर्वच कुंडांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणवेली वाढली आहे. (Panvel has grown in the Godavari river basin)

पाण्यात हातही घालावेना

धार्मिक विधीसाठी रामकुंडाचे महत्त्व मोठे असल्याने या ठिकाणी केवळ जिल्ह्यातूनच नव्हे, तर देशभरातून अस्थींचे विसर्जन करण्यासाठी वर्षभर वर्दळ असते. अलीकडे कोरोना प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने जिल्हाबंदीचे पाऊल उचलल्याने रामकुंडावरील गर्दी काहीशी कमी झालेली असली तरी अद्यापही स्थानिकांना रामकुंडाचाच पर्याय आहे. मात्र सध्या रामकुंडातील साचलेल्या पाण्यावर मोठ्या प्रमाणावर तवंग आहे. त्यामुळे विधी करणे सोडाच पाण्यात हात घालायलाही विधीसाठी आलेले टाळतात, अशी परिस्थिती आहे. मध्यंतरी रामकुंडातील पाणी स्वच्छ राहील, यासाठी महापालिकेने काही पाइपाने या ठिकाणी पाणी आणण्याचे प्रयोगही केले होते, परंतु यशस्वी झाल्याचे दिसत नसल्याने नागरिकांना दूषित पाण्यातच विधी करणे क्रमपात्र झाले आहे.

हेही वाचा: 'डोंगरांची काळी मैना' बहरली! लवकरच होणार बाजारात दाखल

विसर्गच झाला बंद

गोदावरी (Godavari River) नदीपात्रात गंगापूरसह अन्य धरण समूहातून पाणी सोडले जाते; परंतु रामवाडी परिसरात नदीपात्राचे खोलीकरण सुरू असल्याने गेल्या कित्येक दिवसांपासून गोदापात्र प्रवाही नाही. त्यामुळे सध्या नदीपात्रात दिसणारे पाणी नैसर्गिक पाणी नसून सांडपाणी असल्याचे स्पष्ट होते. या सांडपाण्यामुळेच पाण्यावर मोठ्या प्रमाणावर पाणवेलींच्या रोपांसह तवंग आला आहे. हे चित्र रामकुंडाखालील देवीच्या मागील कुंड, खंडेराव महाराज कुंडासह गाडगे महाराज पुलाखालील कुंडातही दिसते. वाढत्या पाणवेलींमुळे गोदापात्रावर हिरवा थर जमा झाला असून, पाणी प्रवाहित नसल्याने तो दिवसेंदिवस जाड होत आहे.

हेही वाचा: डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय HRCT चाचणी करताय? आधी हे वाचा

डासांच्या संख्येत वाढ

वाढत्या पाणवेलींबरोबरच नदीपात्र प्रवाहित नसल्याने डासांच्या संख्येतही मोठी वाढ झाली नाही, त्यामुळे गोदावरीच्या किनाऱ्यावरील पंचवटीसह शहराच्या बाजूच्या वस्तीतही डासांचे साम्राज्य वाढले आहे. एकीकडे कोरोनामुळे नागरिक त्रस्त असतानाच आता डासही वाढू लागल्याने नागरिक त्रस्त आहेत.