Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या प्रयत्नांना यश! धुळे, जळगावचे पार्सल आता थेट नाशिकमधून
Nashik Becomes L-1 Parcel Hub Under India Post Network : नाशिक रोड येथील टपाल विभागाच्या पार्सल हबला एल-१ श्रेणी प्राप्त झाल्याने उत्तर महाराष्ट्रातील टपाल आणि पार्सल वाहतूक अधिक जलद व कार्यक्षम होणार आहे.
नाशिक: नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील टपाल सेवा अधिक वेगवान करण्यासाठी पार्सल हबच्या श्रेणीत वाढ करण्यात आली आहे. यामुळे टपाल सेवा अधिक जलद होणार असल्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.