
ऐन कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांची नीट परीक्षा रविवारी घेण्यात येत आहे. याकरता विद्यार्थ्यांचे ऑनलाइन परीक्षा केंद्र कोसोदूर ठेवण्यात आले आहे. त्यातच ऐनवेळी ओळखपत्रासाठी आधारकार्डची हार्ड कॉपीची सक्ती करण्यात आली. यामुळे विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बघा काय घडले नेमके?
NEET EXAM 2020 : एकतर परीक्षा केंद्र कोसोदूर! त्यात केली 'अशी' सक्ती; विद्यार्थी-पालकांना मनस्ताप, पाहा VIDEO
नाशिक : (सिडको) ऐन कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांची नीट परीक्षा रविवारी घेण्यात येत आहे. याकरता विद्यार्थ्यांचे ऑनलाइन परीक्षा केंद्र कोसोदूर ठेवण्यात आले आहे. त्यातच ऐनवेळी ओळखपत्रासाठी आधारकार्डची हार्ड कॉपीची सक्ती करण्यात आली. यामुळे विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बघा काय घडले नेमके?
पालक व विद्यार्थ्यांचा मनस्ताप...
एकीकडे ऑनलाइनचा जमाना असताना विद्यार्थी मोबाईलमध्ये आपले आधार कार्ड, पॅनकार्ड दाखवत आहेत. तर दुसरीकडे केंद्रसंचालक मात्र हार्ड कॉपीची अवास्तव मागणी करीत आहेत. यामुळे विद्यार्थी व पालकांची हार्ड कॉपी घेण्यासाठी धावा-धाव झाल्याचे दिसून आले. यामुळे परीक्षा आधीच विद्यार्थी व पालक गोंधळलेल्या अवस्थेत दिसून आले. यामुळे हे विद्यार्थी या गोंधळलेल्या अवस्थेत परीक्षा कसे देणार बरं! असाच काहीसा बाका प्रसंग स्मिता जोशी यांना व त्यांच्या विद्यार्थिनी असलेल्या मुलीला मनस्ताप सहन करावा लागला आहे.
हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ
हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी
Web Title: Parents And Students Had Suffer Neet Examination Center Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..