Latest Marathi News | वाहनाचालकांना पट्ट्याचा अन् पोलिसांना ‘ठोस’ कारवाईचा विसर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic In city

Traffic Crisis : वाहनाचालकांना पट्ट्याचा अन् पोलिसांना ‘ठोस’ कारवाईचा विसर

नाशिक : रस्त्यांवर होणाऱ्या बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी रस्त्यालगत पांढरे पट्टे आखण्यात आले. मात्र सध्या वाहनचालकांकडूनच या पट्ट्यांच्या बाहेर येऊन दुचाकी, चारचाकी पार्क केल्या जात असल्याने वाहतूक कोंडीने एमजी रोड रोजच जाम होत आहे.

तर, दुसरीकडे या पट्टयांच्या बाहेर असलेल्या वाहनांवर पोलिसांकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे बेशिस्त वाहनचालक शिस्तीचा अन्‌ वाहतूक पोलिसांना कारवाईचाच विसर पडल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट होते आहे. (parking traffic congestion in city traffic Police Negligation Nashik News)

ऐन सणासुदीच्या काळात शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बाजारपेठांमधील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी भेडसावत आहे. शहराची मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या महात्मा गांधी रोडवर नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या होते. खरेदीसाठी येणाऱ्या वाहनचालक रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क करीत असल्याने कोंडीची समस्येत भरच पडते. त्यातून वाहनचालक, व्यावसायिक व पोलिस यांच्यात नेहमीच वादावादी होते.

वाहतूक पोलिसांनी रस्त्याच्या दुतर्फा पांढरा पट्टा आखला. मात्र, या पट्ट्याबाहेर वाहने पार्क केली जातात. अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे. परंतु, यातही पोलिसांकडून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या चारचाकी वाहने सोडून दुचाकी उचलून नेल्या जातात. तर, चारचाकीवर ना चलनाद्वारे दंडात्मक कारवाई होत ना टोइंग होते. विशेष म्हणजे, स्मार्ट रोडवर सर्रास चारचाकी वाहने अनधिकृतरीत्या पार्क केलेल्या असतात.

हेही वाचा: Post Office Account Scheme : टपाल खात्यातील काही योजनांच्या व्याजदरात वाढ!

परंतु एकाही वाहनांवर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जात नाही. मात्र, या रोडवर दुचाकी पार्क केल्यास वाहतूक शाखेकडून कारवाई केली जात असल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. बेशिस्त पार्किंग वाहनांवर वाहतूक पोलिसांना विसर पडला आहे तर, महात्मा गांधी रोड, शालिमार, शिवाजी रोड या रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्यांचाही विसर वाहनचालकांना पडला आहे.

असून, अर्धा अधिक रस्त्यावर वाहने पार्क असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडीची समस्या भेडसावत आहे. हाकेच्या अंतरावर चौकांमध्ये हेल्मेट कारवाईसाठी थांबलेले वाहतूक पोलिसही खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी येत नसल्याचे चित्र पहावयास मिळते आहे.

हेही वाचा: Rain Update News : गरब्याच्या उत्साहावर कडकडाटासह परतीची मुसळधार!