Latest Marathi News | मिरवणूक मार्गाचे अर्धवट काम; काही भाग अद्यापही नादुरुस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

half Repaired road from Sundar Narayan Mandir to Sunday Fountain.

मिरवणूक मार्गाचे अर्धवट काम; काही भाग अद्यापही नादुरुस्त

जुने नाशिक : महापालिका आयुक्तांच्या मिरवणूक मार्ग पाहणी दौऱ्यानंतर मार्गावरील काही रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली. तर, काही भाग अद्यापही नादुरुस्त असल्याचे आढळून येत आहे. कामे झालेला रस्तादेखील अर्धवट स्वरूपात दुरुस्त करण्यात आला आहे. बुधवारी (ता. ३१) गणेशोत्सवास सुरवात होणार आहे. त्यानंतर दहा दिवसांनी गणरायाचे विसर्जन करण्यात येणार आहे. यानिमित्त तब्बल दोन वर्षानंतर सारडा सर्कल ते पंचवटी गंगा गोदावरी घाटापर्यंत विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. (Partial construction of Ganeshotsav 2022 procession route Nashik Latest Marathi News)

सध्या शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा समजणे अवघड झाले आहे. त्यातून मिरवणूक मार्गदेखील सुटलेला नाही. यानिमित्त शुक्रवारी (ता.२६) महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांनी अधिकाऱ्यांसह मिरवणूक मार्गाची पाहणी केली. महापालिका आयुक्तांकडून मिरवणूक मार्गावरील रस्त्यांचे खड्डे त्वरित बुजवून दुरुस्ती करण्याचे आदेशित केले होते.

त्यांच्या आदेशाने महापालिका ठेकेदारामार्फत रविवार कारंजा परिसरातील सुंदर नारायण मंदिर ते रविवार कारंजापर्यंत रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. परंतु, ती दुरुस्ती केवळ अर्धवट रस्त्याची झालेली दिसून येत आहे. एका बाजूचा रस्ता तयार, तर दुसरा बाजूचा रस्ता ‘जैसे थे’ आहे.

हेही वाचा: नाशकातील संमेलनात भाजप नेत्यांची गर्दी; 'एकनाथ' मात्र एकाकी

इतकेच नव्हे तर रविवार कारंजा परिसरात कारंजास लागून असलेल्या भागातील खड्डे काही दिवसांपूर्वी खडी, माती टाकून बुजविण्यात आले होते. पावसाने माती धुतली गेल्याने खड्ड्यांमध्ये केवल दगड असल्याने रस्ता ओबडधोबड झाला आहे. त्याची दुरुस्ती मात्र करण्यात आलेली नाही. अशाच प्रकारे अन्य काही भागात दुरुस्ती झाली तर काही भागत नाही, अशा प्रकारचे चित्र आहे. संपूर्ण मार्गाची व्यवस्थित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

"अन्य भागातील रस्त्याचे काम सुरू असल्याने या ठिकाणी अर्ध्या रस्त्याचे काम झाले. मंगळवारी (ता.३०) सुंदर नारायण मंदिर ते रविवार कारंजापर्यंतचा उर्वरित अर्ध्या रस्त्याचे काम तसेच कारंजा परिसरातील रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे."

- मदन हरिश्चंद्र, पश्चिम विभागीय अधिकारी

हेही वाचा: Nashik : शहरभर ट्रॅफिक जाम

Web Title: Partial Construction Of Ganeshotsav 2022 Procession Route Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..