esakal | लग्नाचा बार उडवणे भोवले! यजमान, वऱ्हाडी मंडळींना कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नाचा बार उडवणे भोवले! यजमान, वऱ्हाडी मंडळींना कोरोनाची लागण

लग्नाचा बार उडवणे भोवले! यजमान, वऱ्हाडी मंडळींना कोरोनाची लागण

sakal_logo
By
अजित देसाई

सिन्नर : शासनाच्या कोरोना प्रतिबंधात्मक आदेशाकडे दुर्लक्ष करत धुमधडाक्यात लग्नाचा बार उडवल्यानंतर सिन्नरच्या पूर्वेकडील मलढोण या गावात रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. लग्नसोहळा असणाऱ्या घरातील, वऱ्हाडी मंडळींना कोरोना संसर्ग झाला असून, आठवडाभरात तब्बल २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

प्रशासकीय यंत्रणेची धावपळ..

प्रशासकीय यंत्रणेला अर्थातच अंधारात ठेवून या लग्न सोहळ्यासाठी गर्दी जमवली गेल्याची उघड चर्चा आता परिसरात रंगली आहे. विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना तसेच यजमानांच्या कुटुंबात अनेकांना लग्न आटोपल्यानंतर दोन-चार दिवसांनी त्रास जाणवू लागला. त्यात काहींनी वावी, सिन्नर येथील सरकारी रुग्णालयांमध्ये तपासणी करून घेतली. स्थानिक पातळीवर उपचार देखील घेतले. त्यानंतर गावातील अनेक जण ताप, सर्दी व खोकल्याच्या व्याधींनी ग्रासले. सुरुवातीला चार, नंतर आठ तर दोन दिवसांपूर्वी तब्बल दहा जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेची देखील चांगलीच धावपळ उडाली. गावात रंगलेल्या विवाह सोहळ्याबाबत सर्वांनी गप्प राहणे पसंत केले आहे. असे असले तरी दिवसागणिक रुग्ण संख्या वाढत चालली आहे.

हेही वाचा: कोरोना जाईना, लग्न ठरेना! नोकऱ्या गमावलेल्या ग्रामीण भागातील तरुणांची व्यथा

अनेक गावातील नागरिकांची उपस्थिती

या लग्न सोहळ्यासाठी वावीच्या पूर्व भागातील अनेक गावातील नागरिक उपस्थित असल्याचे बोलले जाते. या उपस्थितीमुळे परिसरातील गावांमध्ये देखील काही रुग्ण आढळून आल्याची चर्चा आहे. दरम्यान, मलढोण गावात एकाच वेळी मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्याने वावी आरोग्य केंद्रामार्फत तातडीच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. स्थानिक आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत गावात सर्वेक्षण करण्यात येत असून, आजाराची लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींना तपासणी करून घेण्यासाठी आरोग्य केंद्रात जाण्याची सूचना करण्यात येत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी काहीजण सिन्नर, संगमनेर येथील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून, सौम्य लक्षणे असणारे बहुतांश रुग्ण घरीच थांबून उपचार घेत आहेत.

हेही वाचा: पुन्हा तीच व्यथा! आईच्या मृत्यूनंतर 7 दिवसांनी मुलाचीही अंत्ययात्रा

loading image