मनमाड मुंबई गोदावरी स्पेशल कायमस्वरूपी सुरू करा; प्रवाशांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Train

मनमाड मुंबई गोदावरी स्पेशल कायमस्वरूपी सुरू करा; प्रवाशांची मागणी

नाशिकरोड : मनमाड- मुंबई गोदावरी स्पेशल ट्रेन (Special Train) प्रायोगिक तत्त्वावर ३५ दिवसांसाठी सुरू झाली. तिची मुदत १५ मेपर्यंत होती. ती आता ३० जूनपर्यंत वाढविल्याने नाशिककरांनी समाधान व्यक्त केले आहे. या गाडीला प्रवाशांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून ही गाडी कायमस्वरूपी चालवावी अशी मागणी मासिक पासधारक, प्रवासी संघटनेने व दैनंदिन प्रवाशांनी केली आहे. दीड महिन्यांच्या वाढीव कालावधीत गोदावरी स्पेशल ट्रेनच्या एकूण ९२ फेऱ्या होतील, अशी माहिती भुसावळचे डीआरएम एस. एस. केडिया यांनी ट्विटद्वारे नमूद केले आहे. (Passenger demand Launch Manmad Mumbai Godavari Special permanently Nashik railway News)

रेल्वेगाड्यांना जोपर्यंत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी लाभत नाही. नफ्यात येत नाहीत, तोपर्यंत त्या बंद ठेवण्याचे नवीन धोरण रेल्वेने स्वीकारल्याने गोदावरी बंद झाली आहे. मात्र, सध्या या गाडीला छप्पर फाडके प्रतिसाद मिळत असल्यामुळे ही गाडी रेल्वेच्या महसुलामध्ये भर पाडणारी आहे. त्यामुळे रेल्वेने ही गाडी आता कायमस्वरूपी सुरू ठेवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनामध्ये ही गाडी कायमस्वरूपी सुरू ठेवावी, अशी मागणी केली आहे. कोरोना महामारी आणि तोट्याच्या नावाखाली गोदावरी गाडी बंद करण्यात आली आहे. जनमताचा रेटा वाढल्याने खासदार हेमंत गोडसे व केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी रेल्वेमंत्र्याकडे प्रयत्न केले.

हेही वाचा: Nashik : बिटकोचे १५ दिवसात स्थलांतर

"स्पेशल गोदावरी प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. त्यामुळे ही गाडी कायमस्वरूपी सुरू ठेवावी. यामुळे दुपारी मुंबईहून नाशिककडे निघणाऱ्या प्रवाशांना ही गाडी सोयीची असून गोदावरीमध्ये या गाडीमुळे प्रवाशांचा लोड कमी होणार आहे. या गाडीला देवळाली कॅम्पला थांबा दिल्यास योग्य होईल व इतर गाड्यांवरचा ताण कमी होईल."
- सुदाम शिंदे, नाशिक पासधारक प्रवासी संघटना.

"गोदावरी स्पेशल मनमाडहून सकाळी ८. ४५, तर नाशिकहून ९. ४५ वाजता सुटते. मुंबईला जाताना ती वेळेत जाते. मुंबईहून निघाल्यावर नाशिक रोडला ही गाडी संध्याकाळी ७. १० पोचते. त्यामुळे प्रवाशांना सोईस्कर गाडी आहे. ही कायमस्वरूपी सुरू केल्यास प्रवाशांचे कल्याण होईल."
- शानू निकम.

हेही वाचा: Nashik : PUBG खेळण्याच्या नादात थेट नांदेड ते नाशिक प्रवास

Web Title: Passenger Demand Launch Manmad Mumbai Godavari Special Permanently Nashik Railway News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top