esakal | पॅसेजर, शटलला ग्रीन सिग्नल कधी मिळणार? नोकरदारांसह व्यावसायिकांचीही गैरसोय
sakal

बोलून बातमी शोधा

passenger

पॅसेजर, शटलला ग्रीन सिग्नल कधी मिळणार? प्रवाशांची गैरसोय

sakal_logo
By
एस.डी. आहिरे

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव (coronavirus) रोखण्यासाठी रेल्वे गाड्यांना ब्रेक लावण्यात आला असून प्रादुर्भाव काहीसा ओसरल्यानंतरही या गाड्या सुरू करण्यात न आल्याने सामान्य प्रवाशांची गैरसोय होत आहे. लांब पल्ल्याच्या बोटावर मोजण्याइतक्या रेल्वे मनमाड-निफाड-नाशिकच्या (manmad-nifad-nashik passenger) पटरीवरून धावत आहे. बस पूर्ण क्षमतेने धावत असतील तर सर्वसामान्याच्या पॅसेंजर व शटल गाड्या केव्हा धावणार असा प्रश्‍न प्रवासी उपस्थित करत आहेत. खासदारांनी याप्रश्नी लक्ष घालून या पॅसेंजर गाड्या सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रवासी संघटनांनी म्हटले आहे.

प्रवासी संघटना, नागरिकांचा पाठपुरावा सुरू

जिल्ह्यातील सुमारे एक हजार प्रवाशांना मुंबईसह इच्छितस्थळ गाठण्यासाठी सुपरफास्ट गाड्यांच्या न परवडणाऱ्या तिकीट दरामुळे आर्थिक झळ सोसावी लागत आहे. पॅसेजरचा रेड सिग्नल काढून दररोज मुंबईच्या दिशेने ये-जा करणारे चाकरमानी, व्यावसायिक यांची गैरसोय दूर करावी अशी मागणी प्रवासी करत आहे.

नोकरदारांसह व्यावसायिकांचीही गैरसोय

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून नागरिकांचे जीवन पूर्वपदावर येत आहे. काही दिवसांपासून महामंडळाच्या सर्व बस पुर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करत आहेत. रेल्वे प्रवास मात्र अजुनी बंद आहे. काही गाड्या विशेषता सर्वसामान्याच्या पॅसेजर, शटलला रेल्वे प्रशासनाने हिरवा झेंडा दाखविलेला नाही. धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची कमतरता असल्याने प्रवासी रस्त्यावरून खासगी वाहतूक किंवा बसने प्रवास करतात. नागरिकांना रेल्वेने जलद व सुरक्षित प्रवास करायचा आहे. परंतु मर्यादित गाड्या, आरक्षित सीट यामुळे प्रवासाला मर्यादा पडत आहेत. मनमाड, लासलगाव, निफाड (कुंदेवाडी), नाशिक रेल्वे स्थानकावर मोजक्याच रेल्वे थांबत आहेत.

हेही वाचा: राज्यातील नामांकित शाळांच्या अनुदानात कपात; 141 कोटी वर्ग

साठ रूपयांनी मुंबई प्रवास महाग

मनमाड ते नाशिक रेल्वे मार्गावरून सध्या पटणा एक्सप्रेस (गोरखपूर-मुंबई), पंचवटी (मनमाड-मुंबई), सेवाग्राम (नागपूर-मुंबई), तपोवन (नांदेड-मुंबई) या सकाळच्या सत्रातील रेल्वे मुंबईकडे जातात. पण सामान्य प्रवाशांना या एक्सप्रेसचे तिकीटदर न परडवणारे आहेत. त्यात आरक्षण बंधनकारक असल्याने ६० रूपये अतिरिक्त खर्च येतो. मुंबईला पोहचण्यासाठी आता १३० रुपये खर्च येतो. पॅसेजर, शटलचा खर्च निम्याहून कमी आहे. शिवाय सर्वसामान्याची पॅसेजर ही हक्काची गाडी दुपारच्या सत्रात प्रवासासाठी आहे. त्यामुळे सुमारे एक हजार नोकरदार, व्यावसायिक प्रवाशांची परवड सुरू आहे. प्रवासी वाहतूक संघटनेने मध्यरेल्वेला पत्रव्यवहार करून पॅसेजर सुरू करण्याची मागणी केली. पण रेल्वे बोर्डाने अद्याप अधिकृत सूचना दिल्या नसल्याचे रेल्वे अधिकारी सांगत आहेत.

सर्व काही पूर्वपदावर आलेले असताना पॅसेंजर, शटल रेल्वे सुरू करण्यात कोणतीही हरकत नाही. केंद्र शासनाने सामान्य प्रवाशांच्या भावना समजून घ्याव्या. पॅसेजर सुरू करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या माध्यमातून पाठपुरावा करणार आहे. -नितीन लोढा, सदस्य, प्रवासी संघटना, नाशिक.

हेही वाचा: CoWIN चे नवीन फिचर! लसीकरण झाले की नाही समजणार

loading image
go to top