ताहाराबाद स्थानकात प्रवाशांची फरपट; शौचालयाची दुरावस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

toilet at bus stand

ताहाराबाद स्थानकात प्रवाशांची फरपट; शौचालयाची दुरावस्था

अंतापूर (जि. नाशिक) : ताहाराबाद (ता. बागलाण) येथील बसस्थानक (Bus Stand) आवारातील शौचालयाची (Toilet) दुरुस्ती करून इतर सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य शोभा कांकरिया यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे. (passengers suffered at Taharabad station because of Bad Toilet condition Nashik News)

नाशिक- धुळे जिल्ह्याच्या सरहद्दीवर विंचूर- प्रकाशा राजमार्गावरील भावी तालुका म्हणून ओळखले जाणारे ताहाराबाद हे पंचक्रोशीतील मुख्य केंद्रबिंदूचे गाव असून, येथील बसस्थानकावरून प्रतिदिन गुजरात व शेजारील जिल्ह्यांमध्ये जा- ये करणाऱ्या शेकडो प्रवासी गाड्यांची वर्दळ असते. येथील स्वच्छतागृह व शौचालयाची दयनीय अवस्था झाली आहे. सध्या शाळा, कॉलेज उघडल्याने विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांना नादुरुस्त, अस्वच्छ शौचालयामुळे अडचणी येत आहेत. नळाला पिण्याचे पाणी नसल्याने गैरसोईत अधिकच भर पडली आहे. लहान- मोठ्या खड्ड्यांमुळे प्रवासी व चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना करून पुरेसे शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय व आवारात काँक्रिटीकरण करून कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी बाजार समितीच्या माजी उपसभापती सुशीला जाधव, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य रेखा पवार व नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा: मालेगाव : वाढत्या गुन्हेगारीने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह

"ताहाराबाद मध्यवर्ती दळणवळणाचे मुख्य केंद्रबिंदूचे गाव असून, या बसस्थानकावरून नाशिक, मुंबई, नंदुरबार, नवापूर, मालेगाव, शिर्डी, गुजरात जाण्यासाठी हजारो प्रवासी प्रवास करतात. बसस्थानकात शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसून अस्वच्छतेमुळे गैरसोय होत आहे. वेळोवेळी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलने केली आहेत. पण, संबंधित विभागाने लक्ष दिलेले नाही. समस्या तातडीने सोडवाव्यात अन्यथा आंदोलन करू. "

- दीपक कांकरीया, महासचिव, युवक काँग्रेस, नाशिक जिल्हा

हेही वाचा: Nashik : राज्याचे पोलिस इंटेलिजेन्स ब्युरोच ठरले ‘फेल्युअर’

Web Title: Passengers Suffered At Taharabad Station Because Of Bad Toilet Condition Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikGram Panchayat
go to top