ST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांची भिस्‍त खासगी वाहनांवरच; बसतेय आर्थिक झळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Private Travells

ST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांची भिस्‍त खासगी वाहनांवरच

नाशिक : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसस्‍थानकांवरील फलाट ओस पडलेले बघायला मिळत आहेत, तर दुसरीकडे स्‍थानकाच्‍या आवारात उभ्या ट्रॅव्‍हल्‍सच्‍या वाहनांतून प्रवासी वाहतूक सध्या सुरू आहे. खासगी शिवशाहीसह अन्‍य खासगी वाहनांवरच सध्यातरी प्रवाशांची भिस्‍त असल्‍याची स्‍थिती आहे. सोमवारी (ता. १५) दिवसभरात १६ खासगी शिवशाही नाशिकमधून सोडण्यात आल्‍या.

प्रवाशांना आर्थिक झळ

राज्‍यव्‍यापी आंदोलनाचे जिल्‍हा स्‍तरावर पडसाद कायम आहेत. त्‍यामुळे आगारातील एसटी बस जागीच उभ्या होत्‍या. दिवाळीच्‍या सुट्यांनंतर जनजीवन पूर्वपदावर येत असल्‍याने प्रवासी संख्येत घट झाली आहे. असे असताना, बसस्‍थानकावर आलेल्‍या प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. बहुतांश लांब पल्ल्‍यावर जाणाऱ्या प्रवाशांना मनस्‍तापाला सामोरे जावे लागत आहे. खासगी ट्रॅव्‍हल्‍स व्‍यावसायिकांकडून जादा बस सोडल्‍या जात आहेत. मात्र, खासगी वाहनांतून प्रवास करताना प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागत असल्‍याने त्‍यांना आर्थिक झळ बसत आहे.

हेही वाचा: बाबासाहेबांनी नाशिककरांना दिला शिवकालीन मौल्यवान ठेवा


गुजरातच्‍या गाड्यांसह खासगी शिवशाहीचा आधार

सोमवारी पुण्यासाठी आठ खासगी शिवशाही बस सोडण्यात आल्‍या, तर धुळ्यासाठी सात, बोरिवलीसाठी एक खासगी शिवशाही बस रवाना झाली. याशिवाय महामार्ग बसस्‍थानकावरून गुजरात एसटी महामंडळाच्‍या गाड्या बडोदा, सुरतसह अन्‍य शहरात जाऊ इच्‍छिणाऱ्या प्रवाशांसाठी आधार ठरत आहेत.

हेही वाचा: साहित्य संमेलन ही नाशिकचा लौकिक उंचावण्याची संधी - छगन भुजबळ

loading image
go to top